By  
on  

उर्मिला कोठारे म्हणते, ‘ सेटवर पुन्हा आल्यावर खुप बरं वाटतंय’

कलाकारासाठी सगळ्यात आवडती जागा म्हणजे सेट. जवळपास तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता शुटिंग सुरु झाल्याने पुन्हा एकदा कलाकार आता त्यांच्या सेटकडे परतू लागले आहेत. अभिनेत्री उर्मिला कोठारेलाही सेटवर आल्यावर खुप आनंद झाला आहे. उर्मिला आता ‘एकदा काय झालं सिनेमातून’ प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. जिजाच्या जन्मानंतर हा पहिलाच सिनेमा आहे. या व्हिडियोमध्ये तिने ‘लास्ट डे ऑफ शूट असंही लिहिलं आहे’.   

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Feels good to be back on set @EkdaKayZala ️ #Shoot

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare) on

 

संगीतकार व गायक डॉ. सलील कुलकर्णी आता दिग्दर्शनातही उतरले आहेत. सलील आता प्रेक्षकांसाठी ‘एकदा काय झालं’ हा सिनेमा घेऊन येत आहेत. सुमित राघवन, उर्मिला कोठारे, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले, प्रतीक कोल्हे, मुक्ता पुणतांबेकर, आकांक्षा आठल्ये, रितेश ओहोळ, अर्जुन पुर्णपात्रे, अद्वैत वाकचौडे, अद्वैत धुळेकर आणि मेरवान काळे  हे कलाकार दिसणार आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive