By  
on  

कुशल बद्रिके म्हणतो, ‘एकदा तरी मनसोक्त भिजता यायला हवं’

सध्या सगळीकडेच पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. पण करोनामुळे वर्षा सहलीचे प्लॅन्स फारसे बनताना दिसत नाहीयेत. पण कुशल बद्रिके मात्र याला अपवाद आहे. सध्याच्या मुसळधार पावसात तो चिंब भिजताना दिसतो आहे. कुशलने धबधब्यावरचा फोटो शेअर केला आहे.

 

 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘प्रत्येक पावसात एकदा तरी मनसोक्त भिजता यायला हवं ‘ कुशलचा हा फोटो पाहून अनेकांना त्याच्यासारखंच चिंब भिजण्याची इच्छा झाल्यास नवल नाही.  चला हवा येऊ द्या च्या शुटिंगला सुरुवात झाल्याने कुशल अनेकदा सेटवरचे धमाल फोटो पोस्ट करत असतो.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive