प्लॅनेट मराठी ओटीटी - 'म मानाचा, म मराठीचा' ही टॅगलाईन खऱ्या अर्थाने प्लॅनेट मराठीने अमलात आहे. प्लॅनेट मराठी ओटीटी भारतातील पहिले असे ओटीटी ठरेल ज्यात मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक तिकीट घेऊ शकतील. आगामी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चा महत्त्वाचा भाग असणाऱ्या या डिजिटल थिएटरची घोषणा नुकतीच करण्यात आली. मुख्य ओटीटी माध्यम वर्षाअखेरपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येतं असले तरी, त्यातील महत्त्वाचा आणि पहिला उपक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारं आहे. पे पर व्ह्यू हा आंतराष्ट्रीय फॉरमॅट आहे आणि भारतातील फारच कमी ओटीटी कंपन्या प्रेक्षकांना याद्वारे सेवा देत आहेत. निर्माते अक्षय बर्दापूरकर, अभिनेते पुष्कर श्रोत्री (सी ई ओ) आणि आदित्य ओक यांनी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ या कंपनीची सुरुवात केली. ओटीटीच्या माध्यमातून मराठी चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचवावे, यातून रोजगाराच्या संधी मिळावी, नव्या टॅलेंटला प्रोत्साहन मिळावे, आणि मराठी भाषेचे महत्त्व जपता यावे हि या मागची कल्पना.
म मानाचा
म मराठीचा#PlanetMarathiOTT
या माध्यमाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी फॉलो करा @PlanetMOTT@PlanetMarathi
@akshaybardapurkar@PushkarShrotri@adityaoke @metalpowdergirlVisit https://t.co/koWNGBXxlq#PlanetMarathi #regional #OTT #marathiott pic.twitter.com/6V0LSDXsF2
— Pushkar Shrotri (@PushkarShrotri) August 11, 2020
प्लॅनेट मराठीचे सी एम डी अक्षय बर्दापूरकर आणि सी ओ ओ आदित्य ओक या माध्यमाविषयी बोलताना म्हणाले, "प्लॅनेट मराठी ओटीटीच्या माध्यमातून जगातील सर्व मराठी प्रेक्षक फ्रायडे ‘फर्स्ट-डे फर्स्ट-शो’चा अनुभव घरबसल्या आपल्या फोने द्वारे घेऊ शकतील. पे पर व्ह्यू म्हणजेच एका तिकिटाद्वारे एखादा चित्रपट बघता यावा अशी हि संकल्पना आहे . या माध्यमाचे नाव असेल ‘प्लॅनेट मराठी डिजिटल थिएटर’. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच प्रेक्षक या धम्माल थिएटरचा आनंद घेऊ शकतील.”
प्लॅनेट मराठीच्या यशस्वी कारकिर्दी बद्दल बोलताना अक्षय यांचे हे विधान आले, "प्लॅनेट मराठी नेहेमीच मराठी कन्टेन्टला योग्य स्थान मिळवून देण्यासाठी झटत असते. आम्हाला नेहेमीच काहीतरी नवीन करण्याची इच्छा व कुतूहल असते, म्हणूनच जेव्हा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने निर्मात्यांना आपल्या चित्रपटांना ओटीटी वर रिलीझ (प्रदर्शित) करण्याचा सल्ला दिला तेव्हा आम्ही त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतं खास मराठी चित्रपटांसाठी आपलं असं एक माध्यम निर्माण करून दिलं. प्रेक्षक आता सहज फ्रायडे चे चित्रपट तिकीट बुक करून पाहू शकतील.”
प्रेक्षक कोण-कोणते चित्रपट पाहू शकतील? या प्रश्नाचे उत्तर देताना आदित्य म्हणतात, "विविध प्रकारचे चित्रपट व अनेक निर्माते आपले कन्टेन्ट प्लॅनेट मराठी ओटीटीवर सादर करण्यास उत्सुक आहेत. मात्र नेमके कोणते चित्रपट पाहायला मिळतील हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल. आमची खात्री आहे कि प्रेक्षक प्लॅनेट मराठी ओटीटीच्या कन्टेन्टची विविधता पाहून खूपच खुश होतील. कारण मराठी मध्ये मनोरंजनाचे इतके पर्याय केवळ याच एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.