By  
on  

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या 87 व्या वाढदिवसाचं कुटुंबियांसोबत सेलिब्रेशन!

आपल्या सुरेल स्वरांच्या जादुंनी रसिकांवर अनेक दशकं मोहिनी घालणा-या लाडक्या आशाताई म्हणजेच आशा भोसले या 87 वर्षांच्या झाल्या. आज 8 सप्टेंबर त्यांचा वाढदिवस.  भारतीय संगीत क्षेत्राततलं आशाताईंचं योगदान अतुलनीय आहे. कुटुंबियांसोबत त्यांनी आपला वाढदिवस नुकताच साजरा केला. यावेळी त्यांच्या चेह-यावरचं हसू आणि तेज कायम होतं. 

आशाताई ह्या सध्या मुलगा आनंद आणि सून अनुजा यांच्यासोबत लोणावळ्यात आहेत. त्यांच्या वाढदिवसासाठी त्यांची नातवंड झनई  आणि रंझई यांनी त्यांचा आवडता फ्रेश क्रिम फ्रुट केक मुंबईहून मागवला. सर्वांनी आशाताईंचा ह्या वाढदिवसाचं घरच्याघरीच जोरदार सेलिब्रेशन केलं. 

 

आशाताईंच्या दोन्ही नातवंडांच्या चेह-यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसला. झनईने खास लॉकडाऊन असूनही मुंबईतून आशाताईंसाठी त्यांचे  आवडतं चायनीड आणि जॅपनीज पदार्थ आणले. दोन्ही नातवंडं आशाताईंवर भरभरुन प्रेम करतात, त्यांचीसुध्दा ती प्रचंड लाडकी आहेत. झनई जेव्हा गाते तेव्हा आशातईंना लहानपणीच्या आपणच गातोय असा भास होतो. त्यांची दोन्हीही नातवंड फार हुशार आहेत. 

आशाताईंमध्ये अजूनही एक लहान मूल दडलेलं आहे. 87-88 या वर्षादरम्यान मला आणखी बरंच काही करायचं आहे. टॅलेंट शो #AshaKiAsha साठी आलेल्या 3000  स्पर्धकांमधून योग्य टॅलेण्ट निवडणं हा खरतंर खुप मोठा टास्क आहे, असं त्यां सांगतात . संपूर्ण जगभरातून या स्पर्धेसाठी स्पर्धक भाग घेतायत. आजच्या तरुणाईमध्ये खरंच खुप टॅलेण्ट आहे आणि त्यातून एकाची निवड करणं फार कठीण आहे, असं आशाताई आवर्जून सांगतात. 

मागे वळून पाहताना आशाताई सांगतात, "मला कशाचीच तक्रार नाही. मला जसं जगायचं होतं तसं मी जगले, मी खुप आनंदी आहे. मी स्वत:च्या पायावर उभी राहू शकले याचा मला प्रचंड आनंद आहे. वयाच्या दहाव्या वर्षी मी पहिलं गाणं गायले आणि आता वयाच्या 87 व्या वर्षीसुद्दा मी गातच आहे. माझं छान कुटुंब आहे आणि त्याहीपेक्षा मोठं चाहत्यांचं कुटुंब आहे आणखी काय हवं आयुष्यात....मी खुप समाधानी आहे."

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive