By  
on  

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्या बिटर स्वीट’ सिनेमाच्या शिरपेचात मानाचा तुरा

 राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन ‘बिटर स्वीट’ सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सिनेमाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. हा सिनेमा बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल मधील मानाच्या Jiseok पुरस्कारासाठी नॉमिनेट झाला आहे. क्वेस्ट फिल्मसने या सिनेमाची निर्मिती केली आहे. 

 

याबाबत अनंत महादेवन म्हणतात, ‘ महिला उसतोड कामगारांच्या जीवनावार बिटर स्वीटने खुप खोलवर प्रकाश टाकला आहे. मानवी मुल्यांच्या जागतिक प्रश्नांवर हा सिनेमा भाष्य करताना दिसतो. साखर उद्योगाच्या आतलं वास्तव या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. साखर उद्योगातील कामगार स्त्रीचं कशाप्रकारे शोषण केलं जातं.

 

या स्त्रियांची गर्भाशयं काढली गेली आहेत. कारण काम करण्यासाठी येणारे शारिरीक अडथळे यातून दूर होतात. हे काम करत असलेल्या लोकांविरुद्ध त्यांच्या पद-प्रतिष्ठेविरोधात कुणीही बोलत नाही. पण सगुणा नावाची एक स्त्री याविरोधात उभी राहते. त्या संघर्षाची गोष्ट या सिनेमात आहे. सुचंदा आणि शुभा शेट्टी यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive