‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत भूमिका साकारलेल्या अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचं निधन

By  
on  

ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचं बुधवारी निधन झालं. त्या 84 वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे भाऊ, ३ पुतणे असा असा परिवार आहे. अनेक मालिका, नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. ‘नर्तकी’ हे त्यांचं गाजलेलं नाटक होतं. या नाटकाचे त्यांनी 300 हून अधिक प्रयोग केले.  ‘एकटा जीव सदाशिव’, ‘जोतिबाचा नवस, दे दणादण, लेक चालली सासरला, धनगरवाडा या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं.  ‘अमृतवेल’ आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं होतं.

Recommended

Loading...
Share