By  
on  

ह्या ‘टॉप 10’ मराठी अभिनेत्रींनी गाजवलं यंदाचं वर्ष, कोण आहे यादीत?

२०२० ह्या वर्षाला जरी करोना संकट आणि लॉकडाऊनमुळे ग्रहण लागलं असलं तरी मनोरंजन विश्व गाजवणा-या टॉप 10 मराठी अभिनेत्री कोण याचा उलगडा झाला आहे.   या वर्षात दमदार कामगिरी करणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रींची यादी नुकताच IMDBने  प्रसिध्द केली आहे. या यादीमध्ये चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींचा समावेश आहे. चला तर पाहूयात या यादीमध्ये कोणत्या मराठमोळ्या अभिनेत्रींनी आपलं स्तान पटकावलं आहे. 

 

 

 

सोनाली कुलकर्णी 

 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीतली टॉपची अभिनेत्री आहे. तिचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. मागच्या वर्षी हिरकणी हा बॉक्स ऑफीस हिट सिनेमा देऊन तिने चाहत्यांची मनं जिंकली, यंदा सोनालीच्या अनेक सिनेमांची घोषणा झालीय. अभिनेत्रीसोबतच कुशल नृत्यांगना असलेल्या सिनेसृष्टीच्या अप्सरेच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.  

 

 

अभिनेत्री शिवानी सुर्वे

देवयानी या 2012 साली आलेल्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. यातली प्रमुख भूमिका साकारुन अभिनेत्री शिवानी सुर्वेने आपलं स्थान कलाविश्वात निर्माण केलं, त्यानंतर बिग बॉस मराठी या रिएलिटी शोमधून पुन्हा एकदा शिवानी प्रेक्षकांसमोर आली. त्यासोबतच हिंदीतही शिवानी छोट्या पडद्यावर नायिका म्हणून झळकली. तसंच मराठी सिनेमांमध्ये ही तिने दमदार पदार्पण केलंय. ट््रिपल सीट या सिनेमात ती अंकुश चौधरीसोबत झळकली. 

 

तेजश्री प्रधान 

छोट्या पडद्यावरची उत्कृष्ट लेक आणि सून ही पदवी मानाने मिरवणारी अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानचं नाव सर्वप्रथम घ्यावं लागतं. गेली  अनेक वर्ष ती नायिका म्हणून छोट्या पडद्यावर रसिकांचं मनोरंजन करतेय, लेक लाडकी या घरची, होणार सून मी या घरची आणि आत्ता अग्गंबाई सासूबाई या मालिंकेमधील तिची भूमिका गाजतेय. मालिकांसोबतच तेजश्रीने बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं. अभिनेता शर्मन जोशी सोबत ती हिंदी सिनेमात झळकली होती. याशिवाय काही नाटकांमध्येसुध्दा तेजश्री नायिका साकारते. 

 

सायली संजीव 

अभिनेत्री सायली संजीवचे सोशल मिडीयावर असंख्य चाहते आहेत. 'काहे दिया परदेस' मालिकेतून मिळालेली लोकप्रियता त्यानंतर विविध मराठी सिनेमांमधून सायली प्रेक्षकांचं मनोरंजन करते. त्यामुळे सायलीच्या सोशल मिडीया अपडेटवर तिच्या चाहत्यांचं कायम लक्ष असतं. तसंच ह्या गुणी अभिनेत्रीने मराठी सिनेमांचा एक बस्ताच बांधला आहे. तिच्याकडे अनेक प्रोजेक्टस आहेत. याशिवाय सध्या ती छोट्या पडद्यावरच्या शुभमंगल ऑनलाईन मालिकेत झळकतेय. 

 


 

सई ताम्हणकर 

मराठी अभिनेत्रींमध्ये बोल्ड आणि ग्लॅमरस सई ताम्हणकर आघाडीवर आहे. मराठी सिनेमांसह सई आता बॉलिवूडमध्येसुध्दा दिमाखात झळकतेय. लवकरच क्रिती सेनॉनसोबत सई मीमी या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येतय. याशिवाय अनेक मराठी सिनेमांचे मोठमोठे प्रोजक्टस तिच्याकडे आहेत. अलीकडेच तिने तिचा साड्यांचा नवा ब्रॅण्सुध्दा सुरु केला आहे. 

 

 

वैदही परशुरामी 

वृंदावन या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवणारी गोड आणि लाघवी अभिनेत्री वैदही परशुरामी हिने आणि डॉ. काशिनाथ गाणेकर या सिनेमातून रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली.70-80 च्या दशकांतील कांचन घाणेकर ही व्यक्तिरेखा वैदहीने हुबेहूब वठवली. या सिनेमातील तिच्या भूमिकेचं कौतुक सुरु असतानाच तिने रसिकांना आणखी एक धक्का दिला. तो म्हणजे रोहित शेट्टीच्या बिग बजेट सिंबा या बॉलिवूड सिनेमात वैदही लक्षवेधी भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली. आता वैदहीकडे अनेक सिनेमांचे प्रोजेक्ट्स आहेत. 

 

 

पूजा सावंत 

आपल्या सुंदर अदाकारीने आणि सशक्त अभिनयाने अभिनेत्री पूजा सावंत रसिकांवर गारुड घालते. दगडी चाळ, लपाछपी, क्षणभर विश्रांती अशा अनेक सिनेमांमधून पूजाच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळाली. याशिवाय मराठीतच नाही तर पूजाने
जंगल या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पूजा अनेक फॅशन शोची शो-स्टॉपर असते. अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम मॉडेलही आहे. 

 

 

 

सोनाली कुलकर्णी 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठीसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा झळकते. एक सशक्त अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. डॉ प्रकाश आमटे, गुलाबजाम, आणि डॉ.काशिनाथ घाणेकर ह्या मराठी सिनेमांसह सोनालीने सलमान खानच्या भारतमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती, 

 

अमृता खानविलकर 

मराठीतील बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर हिची खास ओळख आहे. अलिकडेच आलेल्या चोरीचा मामला या सिनेमातून तर तिने धम्मालच उडवून दिली. त्यानंतर खतरों के खिलाडी या स्टंट स्पेशल हिंदी रिएलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. पण एवढ्यावरच थांबेल ती अमृता कसली. अमृताने मराठीसोबतच अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडची वाट धरलीय. 

 

 

ऋता दुर्गुळे  

दुर्वा या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणरी अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिने तिचं स्थान निर्माण केलं. पण ऋताला खरी ओळख आणि महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून मोठा चाहतावर्ग मिळवून दिला तो तिच्या फुलपाखरु या मालिकेने.मालिकेतली वैदही हिच तिची ओळख झाली. सिंगीग स्टार या रिएलिटी शोचं ऋताने खुमासदार सूत्रसंचलसुध्दा पार पाडलं. लवकरच रंगभूमीवर गाजलेल्या अनन्या या नाटकावर आधारित सिनेमात ती नायिका साकारतेय. ह्या भूमिकेसाठी तिने प्रचंड मेहनतही घेतलीय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive