लॉकडाऊनच्या तब्बल दोन वर्षांनंतर थाटामाटात लग्न करण्याचं अनेकांचं स्वप्न साकार झालं. आयुष्यातील हा अविस्मरणीय दिवस खुप खास व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मग यात आपले मराठमोळे सेलिब्रिटी कसे मागे राहतील. रोहित-जुईलीपासून ते राणादा-पाठकबाईंपर्यंत आपल्या लाडक्या कलाकारांनी यंदा लग्नगाठ बांधली. चला पाहुयात, 2022 मध्ये लग्नबेडीत अडकलेल्या सेलिब्रिटींविषयी.
शिवानी रांगोळे- विराजस कुलकर्णी
अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता-लेखक विराजस कुलकर्णी यांनी यंदा लग्नगाठ बांधली. मालिका विश्वातील प्रसिध्द कलाकार म्हणून या दोघांची ओळख आहे. शिवानी आणि विराजस यांनी एकत्र काम केलं नसलं तरी ते एकमेकांना फार पूर्वीपासून ओळखतात. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी यंदा मे महिन्यात लग्न केलं. पुण्यात पार पडलेल्या या शाही विवाह सोहळ्याची बरीच चर्चा रंगली होती. दोघंही मनोरंजनविश्वातील एक गोड कपल म्हणून आता ओळखले जातात.
रोहित राऊत – जुईली जोगळेकर
तरुणाईला वेड लावणा-या रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर ही गायक-गायिकेची जोडी ख-या आयुष्यात यंदा लग्नबंधनात अडकली. सारेगम लिटील चॅम्पस पासून रोहित आणि जुईल यांच्या मैत्रीचा प्रवास सुरु झाला. अनेक प्रोजेक्ट्साठी एकत्र पार्श्वगायन करता करता ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेक वर्ष त एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात शाही थाटात रोहित-जुईलीचा विवाहसोहळा पार पडला.
ह्रता दुर्गुळे – प्रतिक शहा
महाराष्ट्राची क्रश आणि मालिका व सिनेविश्वातील लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळे अखेर यंदा लग्नबंधनात अडकली. हिंदी मालिका दिग्दर्शक प्रतिक शहा सोबत ह्रताने लग्न केलं. काही वर्ष प्रतिकला डेट केल्यानंतर ह्रताने सोशल मिडीयावरुन आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर ह्रताचा रितसर साखरपुडा आणि मग शाही लनसोहळा पार पडला.
अमृता पवार – नील पाटील
छोट्या पडद्यावर विविध भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजेच 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' फेम अमृता पवार ६ जुलै २०२२ रोजी नील पाटीलशी लग्नबंधनात अडकली. अमृताचा पती नील हा पेशाने इंजिनियर आहे. काही जवळचे मित्र व मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अमृताचा मराठमोळ्या रितीरिवाजानुसार लग्नसोहळा पार पडला. ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या ऐतिहासिक मालिकेत जिजाऊंची भूमिका साकारुनअमृता घराघरांत पोहचली. तर हार्दिक जोशी सोबत 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं'तील मॉर्डन अदिती सगळ्यांनाच भावली.
आशय कुलकर्णी –सानिया गोडबोले
‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता आशय कुलकर्णी नुकताच लग्न बेडीत अडकला आहे. कोकणातील निसर्गरम्य दापोलीतील लाडघर येथे समुद्र किनारी त्याचा विवाहसोहळा पार पडला आहे. आशय कुलकर्णी याने सानिया गोडबोले हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. मनोरंजन विश्वातील अन्विता फलटणकर आणि शिवानी-विराजस कुलकर्णी ही जोडी या लग्नसोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होती. सानिया ही प्रोफेशनल क्लासिकल डान्सर आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. लवकरच आशय हा ‘व्हिक्टोरिया’ या आगामी सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
राणादा- पाठकबाई
राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर या तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेच्या जोडीच्या लग्नाची यंदा खुपच धूम होती. हळद, मेहंदी, संगीत, शाही लग्नसोहळा, रिसेप्शन, वरात, पूजा ते अगदी देवदर्शनापर्यंत या जोडीच्या प्रत्येक अपडेट्सची चाहते खुप वाट पाहत होते. मराठी मनोरंजनविश्वातील यंदाचा हा सर्वात चर्चित लग्नसोहळा ठरला. अस्सल मपाठमोळ्या साजात सजलेल्या हार्दिक आणि अक्षयाच्या शाही लग्नसोहळ्याचा थाटच फार भारी होता. चाहत्यांनी सोशल मिडीयावरच हा लग्नसोहळा भरपूर एन्जॉय केला.
हरिश दुधाडे आणि समृध्दी
फर्जंद, फत्तेशिकस्त आणि या सिनेमांमधून ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता हरिश दुधाडे यंदा लग्नबंधनात अडकला. लोणावळा येथे जवळचे नातेवाईक व मोजक्याच मित्र-मंडळींच्या उपस्थितीत हरिशचा लग्नसोहळा पार पडला. समृध्दी असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. अभिनेता अंकित मोहनने हरिशच्या रिसेप्शन सोहळ्याला उपस्थिती लावल्याने सर्वप्रथम त्यानेच हे फोटो शेयर केले होते. छोट्या पडद्यावरसुध्दा अभिनेता हरिश दुधाडे विविध मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडतोय.