Birthday Special : परमसुंदरी सई ताम्हणकरचा जाणून घ्या मिडीयम स्पायसी प्रवास!

By  
on  

बॉलिवूडसह मराठीत आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी परमसुंदरी अर्थात अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा आज वाढदिवस...

सई ही आधीपासूनच बिनधास्त, बोल्ड आणि डॅशिंग आहे. तिचा जन्म सांगलीतला आणि बालपणी ही तिथलंच.. त्यानंतर शिक्षणही सांगलीतचं केलं... पुढे एकांकिका आणि नाटकांतून काम करत ती मालिका क्षेत्रात आली. मग मालिकेतून हळूहळू मराठी चित्रपटसृष्टीत तिचा प्रवास सुरु झाला त्यानंतर हा प्रवास बॉलिवूडपर्यंत पोहोचला आणि आता बॉलिवूड नंतर हा प्रवास IFFA पर्यंत येऊन पोहोचला आहे. 

सईला नुकताच IIFA पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 'मिमी' या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनायचा पुरस्कार मिळाला.  

चतुरस्त्र  भूमिका साकारुन सईने आपली वेगळी छाप सोडली आहे. 'दुनियादारी', 'वजनदार', 'क्लासमेंट्स', 'राक्षस', 'गर्लफ्रेंड', 'वायझेड' पॉंडीचेरी यांसारख्या सिनेमात सईने दमदार भूमिका साकारल्या आहेत. सईच्या काही भूमिकांमुळे तिची ओळख बोल्ड अभिनेत्री म्हणूनही झाली. 'हंटर', 'नो एंट्री', लव्ह सोनियो अशा सिनेमांत कधीही न दिसलेला सईचा बोल्ड अंदाज दिसला. सई मराठी सिनेसृष्टीतील बिकिनी घालणारी बहुधा पहिलीच अभिनेत्री ठरली. 

ज्याप्रकारे तिने बोल्ड भूमिका साकारल्या आहेत, तितक्याच सोज्वळ भूमिका देखील तिने केलेल्या आहेत. 'दुनियादारी', 'धुराळा', 'वाय झेड', 'वजनदार', 'क्लासमेट्स', गर्लफ्रेंड आणि आता आलेला 'मिडीयम स्पायसी' यासारख्या अनेक सिनेमांत तिने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.

याचबरोबर तिने वेबविश्वात देखील तिच्या नावाचा दबदबा कायम ठेवलेला आहे. डेट विथ सई, समांतर आणि अलिकडेच प्रदर्शित झालेली पेटपुराण ही वेबसिरीज चाहत्यांना खुप भावली. 

सईचा अभिनया इतकाच फॅशन सेन्स ही दांडगा आहे. ती कोणत्याही पद्धतीची फॅशन करू शकते आणि तिच्यावर ते अगदी छान दिसतं देखील. फार कमी लोकांना फॅशन सेन्स आहे, त्यातली एक सई आहे असं म्हणायला काही हरकत नाही.

अश्या या बहुढंगी आणि बहूआयामी अभिनेत्री सई ताम्हणकरचा आज वाढदिवस आहे आणि अभिनेत्री सई ताम्हणकरला पिपिंगमून मराठी कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

Recommended

Loading...
Share