Mothers Day Special : पडद्यावरच्या ह्या लाडक्या आईने जिंकली रसिकांची मनं !

By  
on  

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी...असं म्हणतात ते उगीच नाही. जन्मापासून ते आपल्याला घडवण्यापर्यंत खरं तर संपूर्ण आयुष्यभर आईच आपली गुरु असते. .आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मदर्स डे हा एकच दिवस का हा प्रश्न अनेकांना सतावतो....आईपण प्रत्येक दिवशी साजरं व्हायला हवं..छोट्या-मोठ्या कृतीमधून आईला आपण ती आपल्यासाठी किती खास आहे, हे पटवून द्यायला हवं. 

आईसाठी आपलं मूल हे लहान किंवा मोठं कधीच नसतं..तिच्यासाठी  असतं ते फक्त तिचं मूल...  आई ही आईच असते मग ती ख-या आयुष्यातली असो किंवा पडद्यावरची...चला तर मग छोटा पडदा गाजवणा-या वात्सल्यमूर्ती आईंना या मदर्स डेनिमित्त जाणून घेऊयात. 

 

 

आई कुठे काय करते  - अरुधंती  (मधुराणी गोखले-प्रभुलकर ) 

आई कुठे काय करते ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. आईभोवती या मालिकेचं कथानक गुंफण्यात आलं आहे. मालिकेतील अरुंधती यश, ईशा आमि अभिषेक ह्या आपल्या तिन्ही मुलांच्या चांगल्या-वाईट प्रसंगात खंबीरपणे त्यांच्या पाठीशी असते. घरात दिवसभर राबून, प्रत्येकाच्या आवडी-निवडी जपणारी आई कितीही थकली तरी कुटुंबियांची काळजी घेणं थांबवत नाही. तरीही आपण नकळत हा प्रश्न विचारतो, आई कुठे काय करते. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर हिने  ब-याच काळाने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं व आपल्या वात्सल्यरुपी व्यक्तिरेखेतून रसिकांची मनं जिंकली. 

 

अग्गंबाई सूनबाई - शुभ्रा  ( उमा ऋषिकेश ) 

झी मराठीवरील अग्गंबाई सूनबाई या मालिकेच्या नव्या कथानकात एका पाच सहा वर्षाच्या मुलाची शुभ्रा आई आहे. मुलाचं संगोपन योग्य व्हावं म्हणून तिने आपलं करिअरही सोडून दिलंय. आता बबडू हेच तिचं जग आहे. बबडूचं पालन-पोषण नीट व्हावं याकडे ती कटाक्षानं लक्ष देत असते. पण मुलाला जास्त लाडावून ठेऊ नकोस असं शुभ्राच्या सासूबाई म्हणजेच आसावरी तिला स्वानुभवावरुन सांगतात.

उमा ऋषिकेश या गोड अभिनेत्रीने शुभ्राची ही व्यक्तिरेखा खुप छान साकारलीय.

 

मुलगी झाली हो - माऊची आई  (शर्वाणी पिल्लई ) 

तिसरी मुलगी झाली म्हणून वडीलांनी तिला नाकारली पण आईच्या मायेनं तिचं एकटीनं संगोपन केलं. तिला एक चांगलं माणूस बनवलं. आणि आज त्याच लेकीचा तिच्या वडिलांना अभिमान वाटतोय, असं मुलगी झाली हो या मालिकेचं कथानक आहे. अभिनेत्री शर्वाणी पिवल्लईने ही आई साकारलीय. तिच्या मुलीला माऊला बोलता येत नसलं तरी ती तिच्या मनातलं सर्व काही आईसमोर व्यक्त करते. व तिच्या त्या भावना तिच्या आईलाच समजतात. 

 

स्वराज्यजननी जिजामात  - जिजामाता   ( नीना कुळकर्णी ) 

महाराष्ट्राच्या अभिमानाची यशोगाथा आणि एका मुलुखावेगळ्या आईची कथा 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. जिजाऊ माँसाहेबांनी शिवबांना कसं घडवलं, शिवबांनी स्वराज्य कसं स्थापन केलं; हा सगळा इतिहास या मालिकेतून उलगडतो आहे. 

दिग्गज अभिनेत्री नीना कुळकर्णी आणि डॉ. अमोल कोल्हे हे जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुख्य भूमिकांत दिसताहेत.

 

 

Recommended

Loading...
Share