बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने भारतीय सिनेमात खुप मोठं योगदान दिलं आहे. ती एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री असून तिची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही.
माधुरी आणि डान्स परफॉर्मन्स हे समीकरणच आहे. माधुरीचंसुध्दा डान्सवर प्रचंड प्रेम आहे. तिने नृत्याचं शास्त्रशुध्द शिक्षणही घेतलं आहे. माधुरीच्या सौंदर्य आणि अभिनयासोबतच तिच्या डान्सचेसुध्दा असंख्य चाहते आहेत. बहुसंख्य सिनेमातील भूमिकेसोबतच माधुरीची गाणीसुध्दा प्रचंड लोकप्रिय ठरली आहेत.
आज 15 मे माधुरीचा वाढदिवस. यानिमित्ताने या प्रतिभासंपन्न अभिनेत्रीच्या कारकिर्दीतील निवडक टॉप 10 गाणी पाहूयात. 80-90 च्या दशकापासून ते 20 व्या शतकापर्यंत विविध नायकांसह माधुरी जबरदस्त थिरकली.
हाय रे मेरा घागरा ( जवानी है दिवानी )
मार डाला ( देवदास )
धक धक करने लगा (बेटा )
दीदी तेरा देवर दीवाना (हम आपके हैं कौन)
ओ रे पिया (आ जा नचले)
एक दो तीन....(तेजाब)
मेरे पिया घर आए (याराना)
चोली के पीछे क्या है (खलनायक)
क्या सेरा सेरा ( पुकार )
हमको आजकल है इंतजार ( सैलाब )