Birthday special: अभिनयच नाही तर या क्षेत्रातही माधुरी दीक्षितचं ‘कलामाधुर्य’ चर्चेत 

By  
on  

निखळ हास्य, नितळ त्वचा आणि कुरळे केस हे सगळं वर्णन अगदी तंतोतंत कुणाला लागू पडत असेल तर माधुरी दीक्षितला. सिनेमात पदार्पण केल्यापासून एका पिढीला माधुरीने तिच्या सौंदर्य आणि अभिनयाने घायाळ केलं आहे. 
कमालीचा नैसर्गिक अभिनय, लोभस चेहरा, नृत्यनिपुणता आणि मोहक हास्य ही माधुरीची ओळख बनून राहिली आहे. 
1984 मधील अबोध पासून सुरु झालेला तिचा प्रवास आजवर अनेक वळणवाट घेत इथवर पोहोचला आहे. ही सौंदर्यसम्राज्ञी आयुष्यात आज एका नवीन वर्षात पदार्पण करते आहे. करीअरच्या सेकंड इनिंगमध्येही यशाचा अनुभव घेणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरीने हिंदी आणि मराठी अशा दोन्ही सिनेसृष्टीत सध्या आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध केलं आहे. अभिनेत्री म्हणून पदार्पण केलेली माधुरी आता अनेक आयामांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. माधुरी कोणत्या भूमिकेत तुम्हाला जास्त आवडते जरुर सांगा. 

निर्माती: मराठी सिनेमांची निर्मिती हा माधुरीच्या करिअरमधील महत्त्वाचा टप्पा आहे. माधुरीने 15 ऑगस्ट आणि पंचक या सिनेमाची निर्मिती केली आहे. त्यापैकी 15 ऑगस्ट हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला होता. तर पंचक या सिनेमात आदिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान, भारती आचरेकर, सतीश आळेकर, दीप्ती देवी, आशिष कुलकर्णी आणि नंदिता पाटकर हे कलाकार झळकणार आहेत. 

गयिका: माधुरी उत्तम अभिनेत्री आहे, नृत्यांगनाही आहे. पण तिने स्वत:ला उत्तम गायिका म्हणूनही सिद्ध केलं आहे. माधुरी तिच्या ‘कॅंडल’ या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लॉकडॉउनच्या आधी लॉस एन्जेंलीसमध्ये एका प्रसिद्ध स्टुडिओत माधुरीने हे गाणं रेकॉर्ड केलं होतं. 

युट्युबर : माधुरीने काळासोबतच स्वत:ला सतत अपडेट केलं आहे. माधुरी दीक्षितने स्वत:चं युट्युब चॅनेल सुरु केलं आहे. ‘Madhuri dixit nene’ असं तिच्या युट्युब चॅनेलचं नाव आहे. यावर अनेकदा माधुरी तिच्या आयुष्यातील बाबी, ब्युटी सिक्रेट्स शेअर करत असते. आता माधुरी ott प्लॅटफॉर्म वर येण्यास सज्ज झाली आहे. Finding Anamika या सिरीजमधून ती वेब डेब्यू करेल.

परिक्षण: माधुरीच्या नृत्यकौशल्याचे चाहते जगभरात आहेत. माधुरी करिअरच्या सेकंड इनिंगमध्ये ‘डान्स शो’ च्या परिक्षकपदी विराजमान झाली आहे. माधुरी सध्य डान्स दिवाने 3 या शोचं परिक्षण करते आहे. या शोमध्ये माधुरी मुख्य आकर्षण असते. या कार्यक्रमात येणारे पाहुणे, त्यांचा माधुरीसोबतचा डान्स सगळ्यांचं लक्ष वेधतं.

Recommended

Loading...
Share