Peepingmoon special: या जोड्या यावर्षी लग्नाच्या बेडीत झाल्या ‘लॉकडाऊन’

By  
on  

नुकतीच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लग्नाच्या बेडीत अडकली. सोनालीने वाढदिवसाचं औचित्य साधत चाहत्यांशी ही बातमी शेअर केली. सध्या लॉकडाऊनचे पाश भोवताली असले तरी नात्याचे रेशमी बंध मात्र जुळताना दिसत आहेत. अनेक मराठी सेलिब्रिटींनी या लॉकडाऊनमध्ये आणाभाका घेतल्या. यातली तुमची आवडती जोडी कोणती जरुर सांगा.  

सोनाली-कुणाल- अभिनेत्री सोनाली कुलकर्णी फियॉन्से कुणाल बेनोडेकरसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. वाढदिवसानिमित्त अचानक लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. करोनाच्या प्रकोपामुळे सोनालीने साधेपणाने लग्न करण्याला प्राधान्य दिल्याचं शेअर केलं आहे. सोनाली आणि कुणाल यांचा मागील वर्षी साखरपुडा झाला होता. 

 

रुपाली-विजय- ‘लग्नाची वाईफ, वेडिंगची बायकू’ मालिकेत पती-पत्नीच्या व्यक्तिरेखेत दिसलेले  मदन आणि काजोल आता रिअल लाईफ पार्टनर बनणार आहेत. काजोल साकारणा-या रुपाली झंकारने नुकतेच मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. 

 

ऋचा-क्षितिश- अभिनेता क्षितिश दाते आणि अभिनेत्री ऋचा आपटे हे दोघेही नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. मागच्या वर्षी याच जोडीने साखरपुडासुध्दा असा गुपचुप उरकला होता.  दोघांनी एका वर्षानंतर सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत आपल्या साखरपुड्याची माहिती दिली होती. 

रुचिता- आनंद - अभिनेत्री रुचिता जाधव ही ३ मे रोजी बिझनेसमन आनंद यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली. हा लग्नासोहळा काही जवळचे मित्रमंडळी आणि परिवाराच्या उपस्थितीत पार पडल्याचं समजतंय. सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत मोजक्याच मंडळी या लग्नसोहळ्याला उपस्थित होती. 

संग्राम-श्रद्धा - अभिनेता संग्राम समेळ नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. संग्रामचं हे दुसरं लग्न आहे. नुकतीच संग्रामने श्रद्धा फाटकसोबत लगीनगाठ बांधली. श्रद्धाही कोरिओग्राफर असून तिला नृत्याची आवड आहे.

 

Recommended

Loading...
Share