Birthday Special : मृणाल कुलकर्णींनी साकारलेली सोनपरी आजही आहे रसिकांची लाडकी

By  
on  

90 च्या दशकांत टेलिव्हिनजवरची सोनपरी ही काल्पनिक कथानकावर बेतलेली मालिका बच्चेकंपनीना प्रचंड आवडली. या मलिकेचे आजही बरेच फॅन्स आहेत. फ्रुटीच्या आयुष्यातल्या घडामोडींची सोना आंटीला चांगलीच खबर असते. तिचं दु:ख दूर करण्यासाठी सोनपरी जादूची काडी फिरवून चुटकीसरशी तिला हसवते. सोनपरी साकारणा-या प्रसिध्द अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी या भूमिकेतून सर्वांच्या हदयावर अधिराज्य गाजवलं. 


 

मृणाल यांच्या अभिनयाने आजवर अनेक व्यक्तिरेखा साकारल्या. 'सोनपरी' ही त्यांची प्रचंड लोकप्रिय झालेली मालिका. आजही सोनपरीचे लाखो चाहते आहेत. त्यांना सोनपरी म्हणूनच अनेक जण ओळखतात. या मालिकेची जादू फक्त बच्चेकंपनींवरच नाही तर मोठ्यावरही तितकीच झाली. हिंदी मालिका असल्याने मृणाल या देशभरात या मालिकेमुळे सोनपरी म्हणूनच ओळखल्या जातात. 

 

आयी सोनपरी ...हे शिर्षक गीत आणि ही लोकप्रिय मालिका आजही नव्वदच्या दशकांतील बच्चेकंपनी जी आता मोठी झाली आहेत, ती विसरुच शकणार नाहीत. 
 

Recommended

Loading...
Share