Peepingmoon special: मराठीमध्येही रुजतं आहे Shirtless culture , पाहा हे फोटो

By  
on  

पुर्वी मराठी सिनेमांचा नायक म्हटलं की कॉमन मॅनची प्रतिमा डोळ्यासमोर यायची. नायिकेच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये नोकरी करणारा, नोकरी मिळवण्यासाठी धडपडणारा, किंवा गुंडांऐवजी दैंनदिन जीवनात समोर येणा-या समस्यांशी दोन हात करणारा..... पण मराठी सिनेमाने जशी कात टाकली आहेत तशी आता सिनेमाचा नायकही टाकू पाहतो आहे. मानेवर रुळणारे केस, सिक्स पॅक्स, बॉडी फिटिंग कपडे आणि कूल अ‍ॅटिट्युड हा आताच्या मराठी नायकाचा युएसपी आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बॉलिवूडमध्ये पिळदार शरीरयष्टी, सिक्स पॅक्स फ्लाँट करणा-या अभिनेत्यांची वानवा नाही. पण शर्टलेस लूक्सचा हा ट्रेंड मराठी नायकांच्या सोशल मिडियावरही रुजू पाहतो आहे. पुढील फोटोमध्ये तुमचा आवडता नायक आहे का ते जरुर पाहा. 

गश्मीर महाजनी:  Boy next door बिरुद मानाने मिरवणा-या अभिनेत्यांमध्ये गश्मीरचं नाव सगळ्यात वर आहे. गश्मीरला फिटनेसची प्रचंड आवड आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही तो याविषयीच्या गोष्टी पोस्ट करताना दिसतो.

 

 

आदिनाथ कोठारे: बाबांकडून अभिनयाचा वारसा मिळालेल्याज्युनिअर कोठारेंनी मात्र स्वत:ची खास शैली निर्माण केली आहे. आदिनाथ काळासोबत राहण्याचा प्रयत्नात दिसतो. त्यासाठी पुरेपूर मेहनत करण्याचीही त्याची तयारी असते.

 

 

ललित प्रभाकर: मालिकेमुळे चॉकलेट बॉय अशी बनलेली इमेज मोडून काढत ललितने अनेक आयामांना स्पर्श केला आहे. अलीकडेच त्याने पिळदार लूक्स चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

 

 

आकाश ठोसर: सैराटमधून रातोरात स्टार झालेला वंडर बॉय आकाश ठोसरने आपण लंबी रेसचा घोडा असल्याचं सिद्ध केलं आहे. आकाशला वर्कआऊटचं वेड असून अनेकदा तो व्हिडियो ही शेअर करत असतो.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

 

अंकित मोहन:  हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा अंकित मोहन मराठीत झळकला आणि मराठी प्रेक्षकांनांही तो आवडला. फर्जंद' या सिनेमातून मराठी प्रेक्षकांची पसंती त्याने मिळवली. त्याची उत्कृष्ट शरीरयष्ठीचे प्रेक्षक चाहते झाले.  याच फिटनेसचं श्रेय अंकित त्याच्या वडिलांना देतो.

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share