महाराष्ट्राला लाभलेली गौरवशाली परंपरा म्हणजे संतपरंपरा. अध्यात्म आणि प्रबोधन या दोन्हीची कास धरत महाराष्ट्रातील संतांनी भागवत धर्माची पताका फडकत ठेवली आहे. आज आषाढी एकादशी निमित्त संतजीवनावरील हे सिनेमे जरुर पाहा
संत ज्ञानेश्वर : भागवत संप्रदायाचे प्रवर्तक असलेल्या संत ज्ञानेश्वर यांच्यावरचा हा ब्लॅक अॅण्ड व्हाईट सिनेमा. हा सिनेमा प्रभात फिल्म कंपनीने काढला होता. तो १८ मे १९४० रोजी एकाच वेळी मुंबईत आणि पुण्यात प्रकाशित झाला. पुण्यात तो ३६ आठवडे चालला. या सिनेमामुळे प्रभातची कीर्ती जगभर पसरली.
तुकाराम : जगण्याचं कालातीत तत्त्वज्ञान देणारे संतश्रेष्ठ तुकाराम यांच्यावर आजपर्यंत 2 सिनेमा निघाले आहेत. व्ही. शांताराम यांनी ८५ वर्षांपूर्वी ‘संत तुकाराम’ हा चित्रपट पडद्यावर आणला होता. दुस-या सिनेमात अभिनेता जितेंद्र जोशी यांनी तुकारामांची भूमिका साकारली आहे. तर तुकारामांच्या पत्नीची भूमिका राधिका आपटे हिने साकारली आहे.
संत जनाबाई: संत परंपरेतील स्त्री संत म्हणून जनाबाईंचं नाव सर्वप्रथम येतं. दासीचे घरकाम करणारी, गोवऱ्या थापणारी बाई असलेल्या जनाबाईची विठ्ठल भक्ती अजोड होती. त्यांच्या भक्तीचे आजही अनेक दाखले दिले जातात. या सिनेमात अश्विनी एकबोटे जनाबाईंच्या भूमिकेत दिसली आहे.
संत नामदेव: संतशिरोमणी अशी पदवी मिळवणारे व्रज भाषांमध्येही काव्ये रचणारे, शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातहिले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे संत म्हणून नामदेवांचा उल्लेख केला जातो. नामदेवांच्या जीवनावर बेतलेल्या सिनेमामध्ये अभिनेते अविनाश नारकर मुख्य भूमिकेत आहेत.