गोवा ट्रीप हा खरं तर प्रत्येक फ्रेंड्स ग्रुपचं स्वप्न असतं. माझ्या मैत्रिणींसोबतची पहिली ट्रीप ही गोवा ट्रीपच होती. विशेष म्हणजे ज्या ग्रुपसोबत मी गेले होते. त्यापैकीच केवळ दोघीजणीच माझ्या मैत्रिणी होत्या. ज्यांच्यासोबत मी नाटकात काम करायचे. यातील इतर दोघी होत्या त्यांनी मी फारशी ओळखत नव्हते. या गर्ल गॅंग़सोबत मी गोव्याला गेले. त्यापैकी माझी एक मैत्रिण स्कुबा प्रशिक्षक आहे. तिने आमच्यासाठी ही ट्रीप प्लॅन केली होती.
ही ट्रीप मी कधीच विसरु शकत नाही. कारण मी ही पहिली वहिली ट्रीप खुप एंजॉय केली होती. याचवेळी मी पहिल्यांदाच स्कुबा डाईव्हचा अनुभवही घेतला होता. याच पाच दिवसाच्या ट्रीपमध्ये आम्ही कमालीचं एंजॉय केलं होतं. या आठवणीची तुलना एखाद्या सिनेमासोबत करायची झाल्यास ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमाशी नक्कीच करता येईल.
खुप मुली एकत्र आल्या की कायम गॉसिपिंग किंवा इर्षाच असते असं नाही. मुलीही एकत्र धमाल एंजॉय करु शकतात. माझे मित्र मैत्रिणी माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. कुटुंबानंतर माझ्यासाठी ते कायमच महत्त्वाचे आहेत. मी मित्र-मैत्रिणींच्या बाबत सिलेक्टीव्ह आहे. माझे मित्र-मैत्रिणी माझ्या पाठीशी आजवर ते कायमच उभे आहेत.