Friendship day Exclusive: विराजसला मित्र-मैत्रिणींशी असलेलं बाँडिंग या सिनेमातील मित्रांसारखं वाटतं, वाचा सविस्तर

By  
on  

मला शाळेत ड्रामा हा विषय होता. त्यामुळे बरेच मित्र- मैत्रिणी या क्षेत्रातील अजूनही आहेत. त्यावेळीही कधी नाटकातील एखादी चुक असेल तर समोरच्याची खेचण्याची मजाही अनेकदा केली आहे. शाळेतील गमती-जमती खुप आहेत. त्यामुळेच की काय माझे अनेक मित्र-मैत्रिणी अभिनय क्षेत्रातीलच आहेत. 

मित्र - मैत्रिणींसोबतचा एखादा धमाल किस्सा किंवा आठवण सांग

शाळेत असताना मला एक चिट्ठी शिक्षकांनी दुस-या शिक्षकांना देण्यासाठी दिली होती. आणि ती एक चिट्ठी देण्यासाठी आम्ही जवळपास आठ मित्र वर्गाबाहेर पडलो. पण अचानक बाई समोर आल्या आणि आमची चोरी पकडली गेली. अर्थातच या गोष्टीसाठी मला शिक्षा मिळाली. पण हे दिवस खरंच मजेदार होते. 

इंडस्ट्रीमध्ये बनलेले मित्र - मैत्रिणी आणि त्यांच्यासोबतच्या बाँडींगविषयी सांग

जुन्या मित्र-मैत्रिणींसोबत धमाल करायला खरच धमाल येते. मी माझ्या पहिल्या वहिल्या मालिकेतही मी माझ्या मित्-मैत्रिणींसोबतच काम करतोय. आशय आणि सई माझे या मालिकेपुर्वीपासूनच मित्र आहेत. गौतमी आणि मी या मालिकेपुर्वी अनेक नाटकांमधून एकत्र काम केलं आहे. त्यामुळेच की काय गौतमीचं आणि माझं बाँडिंग प्रेक्षकांना आवडत आहे. मी तिच्यासोबत सेटवर कधीही प्रॅंक करत नाही. कारण म्हणजे गौतमीची एक सवय आहे की तिला चिमटे काढायची खुप सवय आहे. तिला हे देखील माहिती आहे की मला गुदगुल्या प्रचंड आणि लगेच होतात. याबाबतचा अर्थातच नुकताच घडलेला एक किस्साही मी शेअर करु इच्छितो. नुकताच माझा हात जखमी असतानाचा सीन होता. यामध्ये एक हात बॅंडेजमध्ये तर एक हात सईच्या हातात होता. सीन संपला तरी तिने माझा हात पकडून ठेवला होता. मी तिला याबाबत विचारलं असता ती म्हणाली की, ‘वि-या आता तुझे दोन्ही हात एंगेज आहेत. आता जर तुला गुदगुल्या केल्या तर मजा येईल. मी तिला लगेच म्हणलं जर या खोट्या प्लॅस्टरने तुझ्या नाकावर ठोसा मारला तर मला जास्त मजा येईल. असे अनेक धमाल किस्से नेहमीच घडत असतात.  

तुझ्या मित्र - मैत्रिणींची स्टोरी एखाद्या फ्रेंडशिपवरील सिनेमाशी मॅच करायची झाली तर तो कोणता सिनेमा असेल आणि का ?

अर्थातच ‘रंग दे बसंती’. मी आठवी-नववीमध्ये असताना हा सिनेमा आला होता. यातील मित्रांचं बाँडिंग मजा मस्ती अगदी आपल्या ग्रुपच्या मजा-मस्तीसारखं वाटायचं.

Recommended

Loading...
Share