By  
on  

Friendship day Exclusive: सेटवरच्या या मैत्रिणीमुळे एकाच गाण्यावर अक्षया नाईकला करावा लागला होता तब्बल 20 वेळा डान्स......... वाचा सविस्तर

आपले मित्र-मैत्रिणी आपला सगळ्यात स्ट्राँग सपोर्ट असतो. एरवी सगळ्यांमध्ये कितीही धमाल, मस्करी चालू दे पण जेव्हा गरज असते ते कायमच एकत्र असतात. 

 

मित्र - मैत्रिणींसोबतचा एखादा धमाल किस्सा किंवा आठवण सांग

खरंतर मित्रमैत्रिणींसोबतची एक खास आठवण शेअर करणं अवघड आहे. कारण अशा खुप आठवणी आहेत ज्या आजही रिफ्रेश करतात. पण एक छोटा किस्सा मी नक्कीच शेअर करु शकते. मी आणि माझी मैत्रीण एक्स्ट्रा अ‍ॅक्टीव्हीटीमध्ये कायमच पुढे असायचो. सगळ्या स्पर्धामध्ये आम्ही दोघीही भाग घ्यायचो. देशभक्तीपर गीत स्पर्धा, डान्स स्पर्धा यात आम्ही पुढे असायचो. एकदा पॅरेंट्स डेला आम्ही गाणार होतो. हे गाणं प्रत्येक वर्गात असलेल्या स्पीकरवर ऐकवलं जाणार होतं. पण हे गाताना एक मोमेंट असा आला की मी आणि माझी मैत्रिण सेम पॉईंटला गाण्याचे शब्द विसरलो. त्या गाण्याचा तो पार्ट आम्ही गायलोच नाही. पण मज्जा अशी झाली की, सगळ्यांना असं वाटलं की स्पीकर बंद झाला. खरं तर ते आम्ही गायलोच नव्हतो. आम्ही गाणं संपवलं तेव्हा आमच्या टीचर्सच्या डोळ्यात पाणी होतं, आमच्या चांगलं गाण्यासाठी त्या कौतुक करत होत्या. आता या लेखाच्या माध्यमातूनच सगळ्यांना कळेल की नक्की काय घडलं होतं. या किस्श्याची आठवण जेव्हा होते. त्यावेळी मी आणि माझी मैत्रिण खुप हसतो. 

 

इंडस्ट्रीमध्ये बनलेले मित्र - मैत्रिणी आणि त्यांच्यासोबतच्या बाँडींगविषयी काय सांगशील 

 

सुंदरा मनामध्ये भरलीमधील प्रणिती, प्रणवदादा आणि समीर हे खुप खास मित्र झाले आहेत. आम्ही चौघे मिळून खुप टवाळक्या, धमाल करत असतो सेटवर. सेटवर समिर सगळ्यांसोबत प्रॅंक करत असतो. अर्थात सगळ्यात जास्त बळी आम्ही पडतो. आमच्या चौघांची चांगलीच गट्टी जमली आहे. याबाबतचा एक किस्सा म्हणजे हेमा  साकारणारी प्रमितीला डान्स आवडतो. पण तो शुट केला जावा अशी तिची इच्छा नसते. आम्ही तिला डान्स करायला प्रवृत्त करत असतोच. एका डान्स दरम्यान जवळपास आम्ही 20 वेळा तो व्हिडियो बनवला होता. थोडक्यात 20 वेळा आम्हाला तोच डान्स करावा लागला होता. अर्थातच आमचं चौघांचं बाँडिंग तितकंच घट्ट आहे. 

 

 

तुझ्या मित्र - मैत्रिणींची स्टोरी एखाद्या फ्रेंडशिपवरील सिनेमाशी मॅच करायची झाली तर तो कोणता सिनेमा असेल आणि का ? 

सिनेमापेक्षा फ्रेंण्ड्स या लोकप्रिय सिरीजशी माझं बाँडिंग नक्कीच कंपेअर करेन. मी त्या सिरीजशी ब-यापैकी रिलेट करते. एकतर माझं फ्रेंड सर्कल खुपच मिक्स अ‍ॅण्ड मॅच प्रकारचं आहे. आणखी एक सांगायचं म्हणजे, रंग दे बसंती सिनेमातील मित्र जसे एकमेकांसाठी कायमच उभे असतात. तसेच माझे अनेक मित्र आहेत. मी नाशिकला आहे. पण अनेकदा मुंबईतील प्रॉब्लेम्समध्ये माझ्या पाठीशी उभे आहेत. ही बाब माझ्यासाठी खुप महत्त्वाची आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive