By  
on  

Independence day: या अभिनेत्यांनी पडद्यावर जिवंत केल्या महापुरुषांच्या व्यक्तिरेखा

आज देशभरात 75 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय. देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाल्याचा आपण सर्व भारतीयांना अभिमान आहे. आजचा दिवस रुपेरी पडद्यावर स्वातंत्र्याचा हा रोमहर्षक इतिहास मांडणारे सिनेमे पाहाच. या सिनेमातील महापुरुषांच्या व्यक्तिरेखा पुढील कलाकारांनी उभ्या केल्या आहेत. 

सुबोध भावे (बाळ गंगाधर टिळक): भारतीय असंतोषचे जनक म्हणून लोकमान्य टिळकांकडे पाहिलं जातं. त्यांचाच बायोपिक म्हणजे ‘लोकमान्य एक युगपुरुष’ हा सिनेमा. अभिनेता सुबोध भावेने यात लोकमान्यांची भूमिका साकारली होती. टिळकांचा करारी बाणा, निस्पृहता व्यक्तिरेखेतून उभी करण्यात सुबोध यशस्वी झाला. 

 

चिन्मय मांडलेकर (राजगुरु) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणारे सेनानी म्हणजे राजगुरु. क्रांतीवीर राजगुरु या सिनेमातून त्यांचा जीवनपट उलगडला. अभिनेता चिन्मय मांडलेकर यात राजगुरुच्या भूमिकेत दिसला आहे. 

 

आशुतोष पत्की (भाई कोतवाल) : इंग्रजांच्या गुलामीतून भारताची सुटका करताना कित्येक क्रांतिवीरांनी हौतात्म्य सस्विकारलं. या क्रांतिवीरांमुळेच आपण आज स्वातंत्र्य अनुभवू शकतोय.ब्रिटिशांविरुद्धच्या सशस्त्र लढ्यात वीरमरण पत्करलेले माथेरानचे भूमिपुत्र विठ्ठल लक्ष्मण उर्फ भाई कोतवाल यांच्या भूमिकेत अभिनेता आशुतोष पत्की झळकला आहे. शहीद भाई कोतवाल या सिनेमातून आशुतोषला पहिल्यांदाच ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली. 

 

 

भुषण प्रधान (गोंद्या आला रे) : क्रांतिवीर चाफेकर बंधूनी पुण्यामध्ये रँड चा वध केला, संपूर्ण जगात केवळ एकच अशी घटना असेल जिथे एकाच घरातील ३ सक्खे भावंड फासावर गेले. या वधावर बेतलेली थरारक सिरीज म्हणजे ‘गोंद्या आला रे’. भुषण या सिनेमात दामोदर हरी चाफेकरांच्या व्यक्तिरेखेत दिसला होता. या सिनेमासाठी भुषणने केसांचा गोटा केला होता. त्यावेळचे फोटोही त्याने शेअर केले होते.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive