By  
on  

PeepingMoon2018: या टॉप 10 मराठी सिनेमांनी गाजवलं यंदाचं वर्ष

2018 हे साल मराठी सिनेमांसाठी अत्यंत चांगलं गेलं असं म्हणायला हरकत नाही. कारण यावर्षी मराठी सिनेमाने जणू कातच टाकली आहे. यावर्षी मराठी सिनेमामध्ये अनेक नवनवीन प्रयोग केले गेले. रसिकांनी अर्थातच या प्रयोगाला मनापासून पसंती दर्शवली. यावर्षी 2018 मध्ये सिनेरसिकांच्या मनात आपलं स्थान मिळवण्यात यशस्वी ठरलेल्या सिनेमांचा आढावा घेऊयात पिपींगमून मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून.    आणि डॉ.काशिनाथ घाणेकर या सिनेमाने मराठी बायोपिकचा चेहरा मोहराच बदलून टाकला. सुबोध भावे यांनी साकारलेली डॉ. काशिनाथ घाणेकरांची भूमिका रसिकांच्या मनात घर करून गेली. याशिवाय सोनाली कुलकर्णी, वैदेही परशुरामी, नंदिता धुरी यांचा अभिनय देखील रसिकांना भावला. वायकॉम १८ मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेला हा सिनेमा या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर आहे.   मुळशी पॅटर्न रांगडेपणा या शब्दाला पुरेपूर जागणा-या या सिनेमाने शहरी आणि ग्रामीण प्रेक्षकांना वेड लावलं. या सिनेमाने शेतक-यांच्या मुलभूत प्रश्नांना हात घालत महानगरांमधील विस्तारत जाणा-या गुन्हेगारीचं दर्शनही घडवलं आहे. वास्तवाच्या अगदी जवळ जाणा-या या सिनेमाला रसिकांनी पसंतीची पोचपावती दिली.   मुंबई-पुणे-मुंबई 3 तीन भागात प्रदर्शित होणारा ‘मुंबई-पुणे-मुंबई हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी यांच्या व्यक्तिरेखा रसिकांना खुपच भावल्या. यावर्षी रिलीज झालेल्या सिनेमाच्या तिस-या भागाला देखील रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.   नाळ लहान मुलाचं भावविश्व उलगडणा-या या सिनेमाने रसिकांच्या मनातील हळवा कोपरा व्यापला. नाळच्या संवेदनशील कथेला नागराज मंजुळेंसारखा सक्षम निर्माता लाभला आहे. यातील ‘जाऊ दे न वं...’ हे गाणंही लोकप्रिय झालं. नागराजने या सिनेमात काम केलं असल्याने त्याच्या अभिनयाचा पैलूही समोर आला आहे.       गुलाबजाम नुसत्या नावानेच तोंडाला पाणी सुटलं असेल ना ! सचिन कुंडलकर दिग्दर्शित या सिनेमाने अगदी हलकी फुलकी कथा फिल्मी फोडणी घालून सर्व्ह केली. सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी अशी काहीशी वेगळी जोडी या निमित्ताने रसिकांसमोर आली. या सिनेमालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.   चुंबक काहीसं वेगळं नाव असणा-या या सिनेमाची कथाही आगळी वेगळी आहे. स्वार्थ आणि माणुसकी या दोन टोकांच्या मधल्या प्रवासाची गोष्ट ‘चुंबक’मध्ये सांगितली आहे. विशेष म्हणजे गीतकार स्वानंद किरकिरे यांनी या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली आहे.  महत्त्वाचं म्हणजे बॉलिवुड खिलाडी अभिनेता अक्षय कुमार या सिनेमाचा निर्माता आहे.   सविता दामोदर परांजपे सविता दामोदर परांजपेसविता दामोदर परांजपे हा सविता दामोदर परांजपे या नाटकावर बेतलेला सिनेमा आहे. थ्रिलर या प्रकारात मोडणा-या या सिनेमाने प्रेक्षकांना चांगलंच घाबरवलं. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केलं आहे. अभिनेता जॉन अब्राहम या सिनेमाचा निर्माता आहे.   फर्जंद मराठी सिनेमे तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागे पडतात असं अनेकदा बोललं जातं. पण फर्जंदने ही उणीव भरून काढली आहे.  सिनेमातील ६० ते ७० टक्के साहस दृश्यांनी कथेत जान आणली आहे. कोंडाजी फर्जंद यांची साहसकथा पडद्यावर साकारताना उत्तम व्हिएफएक्स तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्यादृष्ट्याही हा सिनेमा सरस ठरतो.     न्यूड रवी जाधव दिग्दर्शित या सिनेमाने रिलीज होण्याआधी बराच वाद ओढवून घेतला होता. काहीतरी हटके प्रयोग म्हणून या सिनेमाकडे बघता येईल. या सिनेमाचं विविध फिल्म फेस्टीव्हलमध्ये खुप कौतुक झालं. प्रेक्षकांचा सर्वोत्तम प्रतिसाद मिळाला नसला तरी न्युडचं समीक्षकांनी वारेमाप कौतुक केलं. छाया कदम आणि कल्याणी मुळ्ये यांच्या अभिनयाचंही कौतुक झालं.     आपला माणूस नानाची दमदार भूमिका असलेल्या सिनेमाने ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येला हात घालण्याचा प्रयत्न केला. या सिनेमामध्ये नानासोबतच इरावती हर्षे आणि सुमीत राघवन हे कलाकार देखील होते. यात नाना दुहेरी भूमिकेत दिसला. नात्यातील गुंतागुंत सावरण्याचा प्रयत्न करणारी पात्रं या सिनेमात दिसून येतात. या सिनेमाचा निर्माता अजय देवगण आहे.  

Recommended

PeepingMoon Exclusive