श्रावण महिना संपत आला की वेध लागतात ते लाडक्या गणरायाच्या आगमनाचे. परंतु अद्याप देशावरचं करोना संकट टळलेलं नाही. त्यामुळे घरच्या घरी कुटुंब व मित्र-परिवारासोबत गणेशोत्सव साजरा करण्याकडे मागील वर्षापासून कल आहे. गणोत्सव काळातला ओसंडून वाहणारा उत्साह जरासा कमी झाला असला तरी बाप्पावरची श्रध्दा आणि प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. प्रत्येक जण घरोघरी गणेशोत्सव आपापल्या परीने साजरा करतोय.
दरवर्षी सार्वजनिक मंडळांमध्ये किंवा घरांमध्ये गणेशोत्सवाची ठराविक गाणी लावली जातात. तिच गाणी यंदासुध्दा तुम्ही बाप्पाच्या सेवेत लावा आणि तोच उत्साह पुन्हा मिळवा. चला तर मग पाहुयात गणेशोत्सवाची शोभा वाढविणारी काही निवडक गाणी
सुर निरागस हो:
शंकर महादेवन आणि आनंदी जोशी यांच्या सुमधूर आवाजात असलेलं हे गाणं या यादीत क्रमांक एकला आहे. कट्यार काळजात घुसली या सिनेमातील हे गाणं गणेशवंदनेसाठी ख-या अर्थाने योग्य आहे.
मोरया मोरया:
'उलाढाल' सिनेमातील हे गाणं जुनं असलं तरी आजही तितकंच नवीन आणि उत्साहपुर्ण आहे.
गजानना गजानना:
लोकमान्य: एक युगपुरुष या सिनेमातील ही गणेशवंदना संस्कृतीशी जोडते. टिळकांनी सुरु केलेल्या उत्सवाशी निगडीत असलेली हे गणेशवंदना तितकीच सुरेख आहे.
मोरया:
'दगडी चाळ' सिनेमातील हे गाणं उत्साह वाढवणारं आहे. आदर्श शिंदेच्या आवाजातील गाणं अनेकांचं आवडतं आहे.
या रे या सारे या:
'व्हेंटिलेटर' सिनेमातील हे गाणं गणेशोत्सवातील ‘फॅमिली साँग’ आहे असं म्हटलं तर चुकिचं ठरणार नाही.
तुच माझी आई देवा:
'मोरया' सिनेमातील हे गाणं ख-या अर्थाने गणपतीशी नातं जोडतं. गणपतीला आई वडिलांच्या जागी नेऊन बसवतं.
देवा हो देवा:
‘भिकारी’ सिनेमातील हे गाणं प्रेक्षणीय आणि श्रवणीय आहे. स्वप्नील जोशीवर हे गाणं चित्रित झालं आहे.