PeepingMoon Special : या नवविवाहीत जोडप्यांचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा 

By  
on  

गुढीपाडवा या सणाला उत्साहात जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. या दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन गुढी उभारुन हा सण साजरा करतात. यातच अनेक नवविवाहीत जोडप्यांचा हा पहिला एकत्र गुढीपाडवा आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक जोडप्यांनी 2021 मध्ये तर काहिंनी यावर्षी लगीनगाठ बांधली. यापैकीच काही नवविवाहीत जोडप्यांसाठीचा हा गुढीपाडवा खास असणार आहे.


सुयश टिळक – आयुषी भावे
मागील वर्षी 21 ऑक्टोबर रोजी अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावेने लगीनगाठ बांधली होती. याआधी त्यांनी साखरपुडा केल्याचं सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगितलं होतं. तेव्हा यंदाचा गुढीपाडवा या जोडीसाठी खास असणार आहे. कारण लग्नानंतर पहिल्यांदाच दोघं नवीन वर्षाचं स्वागत करतायत. 

रोहित राऊत – जुईली
गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर यांनी 2022 म्हणजेच याच वर्षी लगीनगाठ बांधलीय. 23 जानेवारी रोजी दोघांनी लग्न केलं. रोहित आणि जुईली गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. लग्नाचे विविध कार्यक्रम पार पाडत त्यांनी थाटात ठरावीक नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत विवाहसोहळा केला. यंदाचा त्यांचाही हा लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडवा सण आहे.

रुचिता जाधव – आनंद माने
अभिनेत्री रुचिता जाधवने मागील वर्षी 3 मे 2021 रोजी बिजनेसमन आनंद मानेसोबत लग्न केलं. रुचिताच्या लग्नाचा थाट काही निऱाळाच होता. त्यामुळे हे लग्न चर्चेत आलं. रुचिता देखील आनंदसोबत लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा करेल.

रसिका सुनील – आदित्य 
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून शनायाची भूमिका साकारणारी रसिका सुनीलनेही मागील वर्षी लग्न केलं. गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग सोहळा पार पडला होता. 18 ऑक्टोबर 2021 मध्ये रसिकाने बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबत लगीनगाठ बांधली. आदित्य हा परदेशात असतो तेव्हा यंदाचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा दोघं एकत्र साजरा करतील का हे कळेलच. 
या कलाकारांसह अनेक जण यंदाचा कोरोनाचे सर्व नियम उठल्यानंतरचा गुढीपाडवा सण आनंदात, उत्साहात साजरा करत नवीन वर्षाचं स्वागत करतायत.

Recommended

Loading...
Share