'हिरकणी'च्या त्या दृश्यादरम्यान सोनालीचे केस आणि साडी जळाली होती, वाचा सविस्तर

By  
on  

 'हिरकणी' सिनेमाने बॉक्स ऑफीसवर धडाकेबाज कामगिरी तर केलीच पण त्यासोबतच रसिकांच्या मनातसुध्दा खास स्थान निर्माण केलं. या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने 'हिरकणी'ची प्रमुख भूमिका साकारत मनं जिंकली आहेत. हिरकणी साकारण्यासाठी सोनालीने खुप खास तयारी केली होती. यासंबंधी पिपींगमून मराठीशी बोलताना मात्र सोनालीने शूटिंगदरम्यान घडलेला एक थरारक किस्सा सांगितला, तुम्हालासुध्दा तो ऐकून अंगावर शहारा येईल. 

सोनाली म्हणाली,''रायगडावर हिरकणीचं शूटिंग करणं अत्यंत अवघड होतं. जिमी म्हणजे जी शूटिंगसाठी जी मोठी क्रेन असते ती रायगडाच्या पायथ्यावरुन वर नेणं तसेच संपूर्ण कलाकार आणि युनिट यांची ये-जा करणं आणणं हे युनिटसाठी खुप आवाहनात्मक काम होतं. तसेच मी रात्री कडा उतरतानाच्या महत्त्वपूर्ण दृश्यांपैकी जे एक आगीचे लोळ तिच्या अंगावर येतात त्या दृश्याच्या  शूटिंग दरम्यान माझी साडी आणि केस जळाले होते. परंतु जे हिरकणीने भोगलंय त्याच्या पुढे आमची ही संकटं काहीच नव्हती. हिरकणीच्या शौर्याला सलाम''

यावरुनच सोनालीने या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत व कष्ट दिसून येतात. 

 

पाहा पिपींगमून मराठीसह सोनालीची खास मुलाखत :

 

“सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे, आपले बाळ घरी एकटे असेल...भूकेले असेल या विचाराने व्याकूळ झालेली हिरकणी गडाची खोल कडा उतरुन जाण्याचं धाडस दाखवते”, ही गोष्ट आपण सर्वजण शाळेत शिकलोय. ही गोष्ट ऐकल्यावर आपल्या सर्वांना त्या आईचं खरोखर नवल वाटतं. शाळेत शिकवलेली हिरकणीची गोष्ट आजही तशीच्या तशी मनात खूप खोलवर घर करुन बसली आहे. हिरकणीची हिच शैर्यगाथा या सिनेमाच्या निमित्ताने आजच्या पिढीलासुध्दा अनुभवता आली. 

 

Recommended

Loading...
Share