बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार 2018 रोजी त्याच्या 'चुंबक' या मराठी सिनेमाच्या प्रोमोशनसाठी आणि पिपींगमून मराठीची वेबसाईट लॉंच करण्यासाठी पिपींगमूनच्या कार्यालयात आला होता. यावेळी त्याने अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या.
मराठी सिनेमांविषयी अक्षय कुमार भरभरुन बोलत होता, "मराठी सिनेमांचं आपल्याला नेहमीच अप्रुप वाटतं, सशक्त कथा आणि बोल्ड विषय यामुळे मराठी सिनेमे प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करतात", असं तो यावेळी म्हणाला.
मराठी सिनेमांमधील तुम्हाला काय आवडतं हे विचारल्यावर, अक्षय म्हणतो “आज विविध विषयांवर मराठी सिनेमे येत आहेत. त्यांच्यात नेहमीच एक विविधता जाणवते. हिंदी सिनेमात ज्या विषयांवर सिनेमे तयार करण्यात आले नाहीत, त्यावर मराठी सिनेमे बनले आहेत. मराठी सिनेमांचे विषय फार चोखंदळ अससतात. मराठीत नेहमीच बोल्ड विषय हाताळले जातात.
हिंदी सिनेमात तेवढं धाडस नाही. मला वाटतं हिंदी सिनेमांनी मराठीचं अनुकरण करायला हवं. मराठीतला’ बालक-पालक’ सिनेमा मी पाहिला आहे. सिनेमाद्वारे जबरदस्त संदेश पोहचवण्यात आला आहे. मला तो विषय फार भावला. हा सिनेमा हिंदीत व्हायला हवा, अशी माझी इच्छा आहे. ”
पाहा संपूर्ण मुलाखत
‘72 मैल –एक प्रवास’ सिनेमानंतर अक्षय ‘चुंबक’सह मराठी प्रेक्षकांसमोर एक हद्यस्पर्शी आणि हटके विषय घेईन आला गीतकार-संगीतकार आणि अभिनेते स्वानंद किरकिरेंची यात प्रमुख भूमिका आहे.
चुंबक हा पहिलाच सिनेमा आहे, ज्याला अक्षय कुमारने सादरकर्ते म्हणून आपलं नाव लावलं.