आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे. महाराष्ट्रासह देशभरात कोरोनामुळे अनेक प्रतिबंध लावण्यात आले, त्यामुळे गेल्यावर्षी आणि ह्यावर्षी देखील महाराष्ट्राला वारी अनुभवता आली नाही. पण सारेगमा लिटील चॅम्प्समधील लिटिल चॅम्प्सनी त्यांच्या सुमधुर गाण्यांनी आपल्याला विठूमाऊलीच दर्शन घडवलं. पण कार्यक्रमात मृण्मयीनेही खास कविता सादर केली. या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये मृण्मयी म्हणते, ‘रखुमाई म्हणतीये बायांनो - रुसणं सोडू नका !
सा रे ग म प मध्ये जेव्हा आषाढी साजरी करायची ठरली तेव्हा डोक्यामध्ये पहिला विचार आला प्राजक्त देशमुख चा... रखुमाईला- विठुरायाला, जसं आपण पेना मध्ये शाई भरतो, तसं स्वतःमध्ये भरून ठेवलं आहे त्यानी.. रात्री उशिरा त्याला फोन केला होता आणि पहाटे पहाटे त्यानी ही कविता लिहून पाठवली.. वेळेच्या नियमांमुळे तीनही भागांमध्ये तिला जागा नाही मिळाली.. पण म्हणून न रूसता सोशल मीडिया वरती हीनं जागा पटकावली.. मित्रा प्राजक्त.. तूझ्या मुळे मी रूसणं सोडणार नाहीये... खूप प्रेम..’