सोनी मराठी वाहिनी वरील फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. ' इंडियन आयडल मराठी ' हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. महाराष्ट्राला टॉप १० स्पर्धक मिळाले असून विजेतेपदासाठी सुरांची टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरु झाली आहे. अजय-अतुल सारखी लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक स्पर्धकांना उत्तम मार्गदर्शन करत असल्याने स्पर्धकांचा जोश वाढतो आहे. निफाड, नाशिकचा प्रतिक सोळसे त्याच्या दमदार आवाजाने परिक्षकांची मन जिंकतो आहे. प्रतिकची आत्ताच झिंगाट परफॉर्मन्सची हॅट्रिक झाली होती आणि या ;लोकसंगीत विशेष आठवड्यातही त्याला झिंगाट मिळाला आहे. दुसऱ्या हॅट्रिककडे त्याची वाटचाल आता सुरु झाली आहे.
लोकसंगीत विशेष आठवड्यात प्रतिकने छत्रपती शिवाजी महाराजांना पोवाड्यातून मानाचा मुजरा दिला. खुद्द गायक नंदेश उमप यांनी प्रतिकच्या'सादरीकरणाचं आणि आवाजाचं कौतुक केलं. दुसऱ्या हॅट्रिकडे प्रतिकची वाटचाल सुरु झाली असून येणाऱ्या आठवड्यात तो त्याच्या सादरीकरणाने परीक्षकांची मनं जिंकू शकेल का ही उत्सुकतेची बाब आहे.
प्रतिकची दमदार गाणी ऐकण्यासाठी पाहा, फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित 'इंडियन आयडल मराठी', सोम.-बुध., रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठी वाहिनीव