सोनी मराठी वाहिनीवर २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या 'इंडियन आयडल मराठी' च्या सूत्रसंचालनाची धुरा स्वानंदी टिकेकर ही सांभाळणार आहे. स्वानंदी सोनी मराठी वाहिनीवरील 'सिंगिंग स्टार' या कथाबाह्य कार्यक्रमाची विजेती होती.
अभिनय, गाणं आणि आता निवेदनाचीही जबाबदारी तिने स्विकारली आहे. अजय-अतुल हे या कार्यक्रमाचे परिक्षक असून येत्या २२ नोव्हेंबरपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना 'इंडियन आयडल मराठी' च्या रूपात सुरांची पर्वणी मिळणार आहे.