'खतरों के खिलाड़ी 10'च्या प्रोमोमध्ये आहे ही मराठमोळी अभिनेत्री

By  
on  

‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये अंगाचा थरकाप उडवणारे स्टंट्स, एक्शन, टास्क असतात. आणि सेलिब्रिटींना ते करताना पाहणं रंजक असतं. त्यातच यंदाच्या सिझनमध्ये एक मराठीमोळी अभिनेत्रीही पाहायला मिळणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. नुकताच या शोच्या यंदाच्या सिझनचा प्रोमो रिलीज झाला आहे. आणि या प्रोमोमध्ये अमृता खानविलकरही पाहायला मिळतेय. 

अमृता खानविलकरने आत्तापर्यंत बऱ्याच हिंदी रिएलिटी शोमध्ये काम केलय. आणि आता ‘खतरों के खिलाडी 10’मध्ये स्पर्धक म्हणून अमृता दिसेल. 

अमृता खानविलकरने आत्तापर्यंत बरेच हिंदी आणि मराठी रिएलिटी शो केले आहेत. कधी स्पर्धक, कधी सुत्रसंचालक, तर कधी परिक्षक अशा विविध भूमिकांमध्ये ती आत्तापर्यंत दिसली आहे. खतरों के खिलाडी 10 या शोच्या माध्यमातून ती पहिल्यांदाच स्टंट्स आणि विविध टास्क करताना दिसेल.

यंदाच्या सिझनमधील इतर स्पर्धकांसोबत अमृताची चांगलीच मैत्री झाली असून काहींशी अमृतासोबत आधीपासूनच मैत्री आहे. याच शोमध्ये अभिनेत्री करिश्मा टन्नादेखील आहे.

नच बलिये-7मध्ये अमृता आणि करिश्मा हे दोघेही स्पर्धक होते. नच बलियेमुळे अमृता आणि करिश्माची मैत्री झाली आणि आता खतरों के खिलाडीमध्ये त्यांची हीच मैत्री पुन्हा पाहायला मिळेल. 
 

Recommended

Loading...
Share