हे मराठी कलाकार सध्या गाजवत आहेत हिंदी रिएलिटी शो 

By  
on  

हिंदी रिएलिटी शोमध्ये मराठी कलाकारांची वर्णी लागलेली पाहायला मिळणं काही नवीन नाही. मात्र सध्या बऱ्याच हिंदी रिएलिटी शोमध्ये काही मराठमोळे चेहरे पाहायला मिळत आहेत. मराठी इंडस्ट्रीत प्रसिद्ध असलेले हे चेहरे हिंदी रिएलिटी शोमध्ये चांगलीच पसंती मिळवत आहेत. 


आत्तापर्यंत बऱ्याच हिंदी रिएलिटी शोमध्ये दिसलेली अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या खतरो के खिलाडीच्या दहाव्या पर्वात दिसत आहेत.

नुकत्याच सुरु झालेल्या या पर्वात कठीण स्टंट पूर्ण करून इथेही अमृता प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये अमृताने चांगली कामगिरी केल्याने चाहते आनंदी आहेत. शिवाय शोमध्ये अधूनमधून अमृताचा डान्सही पाहायला मिळतोय.  

नुकताच इंडियन आय़डॉलच्या अकराव्या पर्वात मराठमोळा गायक रोहित राउत दिसला. पूर्ण सिझनभर त्याने परिक्षकांची आणि प्रेक्षकांचीही मनं जिंकली.

या पर्वात फायनलपर्यंत पोहचुन रोहितने दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवलं आणि इतर स्पर्धकांच्या तुलनेत त्यानेही इंडियन आयडलचं यंदाचं पर्व चांगलचं गाजवलं.


हिंदी बिग बॉसच्या 13व्या सिझननंतर मुझसे शादी करोगे हा नवा शो नुकताच सुरु झालाय. या शोमध्ये बिग बॉसमधील पारस आणि शहनाझ या स्पर्धकांचं लग्न लावून देण्यासाठीचा हा शो आहे. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आलेली हिना पांचाळ या शोमध्ये स्पर्धक म्हणून दाखल झाली आहे. या शोचा फॉरमॅट बिग बॉसच्या घरासारखाच आहे. शिवाय या शोमधून हिनाची प्रचंड चर्चा होत आहे. 

एकूणच यंदाच्या या हिंदी रिएलिटी शोमध्ये या मराठमोळ्या कलाकारांची चांगलीच चर्चा होत आहे. 

 
 

Recommended

Loading...
Share