सिंगिंग स्टारचे स्पर्धक असणार आहेत हे दोन सेलिब्रिटी, ओळखलं का तुम्ही

By  
on  

सोनी मराठी वाहिनीवर एका नव्या रिअ‍ॅलिटी शोची सुरुवात होणार आहे. 'सिंगिंग स्टार'  असं या कार्यक्रमाचं नाव आहे. गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे अशी या शो ची टॅगलाईन आहे. या शोचे स्पर्धक असणार आहेत मराठी सेलिब्रिटी. ऋता दुर्गुळे या शोचं  सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अभिनेता, निवेदक आणि कवी असलेला 'संकर्षण कर्‍हाडे' 'केतकी भावे'च्या साथीनं आणणार त्याच्यातला गायक जगासमोर! पाहा, 'सिंगिंग स्टार' 21 ऑगस्टपासून... गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे . . . फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर. #सिंगिंगस्टार #SingingStar #सोनीमराठी #SonyMarathi #विणूयाअतूटनाती #VinuyAatutNati

A post shared by Sony मराठी (@sonymarathi) on

 

तर बेला शेंडे, प्रशांत दामले आणि सलील कुलकर्णी हे या शोचं परिक्षण करणार आहेत. तर या स्पर्धेत भाग घेत असलेल्या सेलिब्रिटी जोड्या आहेत संकर्षण क-हाडे आणि प्रियांका बर्वे. इतके दिवस सुत्रसंचालनाच कौशल्य दाखवलेला संकर्षण आता गायनातही सुर लावताना दिसतो आहे. यासोबतच दुसरी सेलिब्रिटी जोडी आहे. गिरीजा ओक आणि ऋषीकेश कामेरकर.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मालिका, चित्रपट, निवेदन या माध्यमांतून प्रेक्षकांची मनं जिंकलेली गिरीजा ओक-गोडबोले आता येतेय तिच्या गाण्यातून प्रेक्षकांची मनं जिंकायला आणि तिची साथ देतोय ऋषिकेश कामेरकर. पाहा, 'सिंगिंग स्टार'... 21 ऑगस्टपासून, शुक्र.-शनि. रात्री 9 वा. गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे . . . फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर. #सिंगिंगस्टार #SingingStar #सोनीमराठी #SonyMarathi #विणूयाअतूटनाती #VinuyaAtutNati

A post shared by Sony मराठी (@sonymarathi) on

 

 

मालिका, चित्रपट, निवेदन या माध्यमांतून प्रेक्षकांची मनं जिंकलेली गिरीजा ओक आता गाण्यातून मनं जिंकणार आहे. हा शो 21 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Recommended

Loading...
Share