'सिंगिंग स्टार'च्या मंचावर अजय आणि बेला येणार तब्बल दहा वर्षांनी एकत्र गाणार

By  
on  

अजय आणि अतुल या जोडीनं फक्त मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीलाही आपल्या गाण्यांवर थिरकायला लावलं आहे. या अफलातून जोडीची सर्वच गाणी सुपर हीट आहेत! महाराष्ट्राची ही लाडकी जोडी आता येतेय सोनी मराठी वाहिनीच्या 'सिंगिंग स्टार'च्या मंचावर!

बेला शेंडे ही 'सिंगिंग स्टार' या कार्यक्रमात परीक्षक आहे. अजय आणि बेला यांनी तब्बल दहा वर्षांपूर्वी 'मथुरेच्या बाजरी' हे गाणं एकत्र गायलं होतं. त्यानंतर आज, दहा वर्षांनी त्यांनी 'सिंगिंग स्टार'च्या मंचावर एकत्र गाणं गायलं आहे!

 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मधले वीस दिवस 'सिंगिंग स्टार'चं चित्रीकरण बंद होतं आणि आता ते दणक्यात  सुरू झालं आहे  अजय-अतुलच्या आगमनानं...
'सिंगिंग स्टार' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या  विशेष पसंतीस उतरला आहे.  येत्या १८ तारखेच्या कार्यक्रमात अजय-अतुल संगीत सोहळा हा विशेष भाग असणार आहे. या विशेष भागात स्पर्धक सादर करणार आहेत अजय-अतुल यांची गाणी!!  इतक्या मोठ्या दिग्गजांसमोर सादरीकरण  करताना स्पर्धकांनामध्ये उत्साह आणि भीती असे मिश्र भाव आहेत. स्पर्धक आणि त्यांचे मेंटॉर यांनी अजय-अतुल यांच्यासाठी खास गाणी तयार केली आहेत.    

पाहायला विसरू नका 'सिंगिंग स्टार' अजय-अतुल संगीत सोहळा, १८ सप्टेंबर रात्री ९ ते १२, फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Recommended

Loading...
Share