पाहा Video : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर येणार केदार शिंदेंची 'सुखी माणसाचा सदरा' मालिका, भरत जाधव यांची मुख्य भूमिका

By  
on  

अनेक दिवसांपासून प्रसिद्ध दिग्दर्शक त्यांच्या आगामी मालिकेविषयी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगत होते. आता मात्र या मालिकेची छोटीशी झलक समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव या मालिकेत मुख्य भूमिकेत असून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या मालिकेच्या टीझरमध्येही ते दिसत आहेत. 'सुखी माणसाचा सदरा' असं या मालिकेचा नाव आहे. या मालिकेच्या निमित्ताने या मालिकेचे दिग्दर्शक केदार शिंदेसह भरत जाधवही अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर  पुनरागमन करत आहेत.

केदार शिंदे यांनी मालिकेविषयीची छोटीशी झलक नुकतीच शेयर केली आहे. यावरुन मालिकेची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

केदार या पोस्टमध्ये लिहीतात की, "कलर्स मराठी या चॅनेलवर २५ ॲाक्टोबर पासून घेऊन येतोय. तुमचा दसरा शुभ करण्यासाठी!! तुमच्या घराचा आरसा आहे हा!!तुमचं प्रतिबिंब यात दिसेल. सुख मागून मिळत नाही.. पण हक्काच्या माणसाला सांगितलं की, नक्की लाभतं. मी तुमच्या हक्काचा माणूस आहे. श्री स्वामी समर्थ."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Sukhimanasachasadara #colorsmarathi या चॅनेलवर २५ ॲाक्टोबर पासून घेऊन येतोय. तुमचा दसरा शुभ करण्यासाठी!! तुमच्या घराचा आरसा आहे हा!!तुमचं प्रतिबिंब यात दिसेल. सुख मागून मिळत नाही.. पण हक्काच्या माणसाला सांगितलं की, नक्की लाभतं. मी तुमच्या हक्काचा माणूस आहे. श्री स्वामी समर्थ.

A post shared by Kedaar Yeshodhara Shinde (@kedaarshinde) on

 

येत्या 25 ऑक्टोबरपासून दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. केदार शिंदे आणि भरत जाधव या जोडीने केलेलं काम कायमच हिट ठरलेलं आहे. तेव्हा या मालिकेतूनही या जोडीला प्रेक्षकांचं भरपुर प्रेम मिळेल यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share