By  
on  

 'तुझ्यात जीव रंगला'मध्ये वहिनी साहेब परत येतेय, ही अभिनेत्री साकारणार नंदिता वहिनी

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत इतर भूमिकांप्रमाणे नंदिता वहिनींची खलनायकी भूमिकाही लक्षवेधी ठरली. तिच्या भूमिकेतील संवाद, तिची हटके स्टाईल लोकप्रिय झाली. फसवेगिरी आणि कटकारस्थानासाठी शिक्षा भोगत असलेल्या नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेब आता पुन्हा मालिकेत एन्ट्री करत आहेत. एकीकडे या मालिकेला आता वेगळं वळण मिळत असताना नंदिता वहिनीची पुन्हा एन्ट्री होत आहे. तिच्यासोबत सुरज देखील असेल. 

इतकी वर्षे या मालिकेत अभिनेत्री धनश्री कडगांवकर नंदिता वहिनींच्या भूमिकेत लोकप्रिय ठरली. मात्र आता नव्या एन्ट्रीसह नवा चेहरा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार आता नंदिता वहिनीच्या म्हणजेच वहिनीसाहेबांच्या भूमिकेत दिसेल. माधुरी ही एक उत्तम नृत्यांगना असून तिने अप्सरा आली हा डान्स रिएलिटी कार्यक्रम देखील जिंकला होता. मात्र आता ती आता नंदिता वहिनींच्या भूमिकेत काय कमाल करतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

4 वर्षे आणि 1200 एपिसोडचा टप्पा पूर्ण करत असताना आता नंदिता वहिनीची एन्ट्री वेगळा ट्विस्ट घेऊन येत आहे. मात्र नंदिता वहिनी आणि सुरज या दोघांना गोदाक्का आणि राणादा घरात घेतील की नाही ? नंदिता वहिनीत काय बदल झाला असेल ? हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये समोर येईलच. नंदिता वहिनीच्या एन्ट्रीचा एक नवा प्रोमोही नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive