'दख्खनचा राजा जोतिबा' ही नवी मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. पौराणिक मालिकांसाठी बरीच मेहनत लागते. विशेषकरून त्या भूमिकांच्या लुकसाठीचा पेहराव, तशी शरीरयष्टी या सगळ्या गोष्टींचा त्यात समावेश आहे. 'दख्खनचा राजा जोतिबा' या मालिकेसाठी अभिनेता विशाल निकमनेही तितकीच मेहनत घेतली आहे.
या मालिकेत विशाल जोतिबांच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठीची शरीरयष्टी, तसा लुक करण्यासाठी विशालला बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. विशालने नुकतच सोशल मिडीयावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या मालिकेचा प्रवास सुरु करण्यापासून त्या लुकमध्ये परफेक्ट येईपर्यंतचा प्रवास त्याने फोटोरुपात सांगितला आहे.
या मालिकेसाठी विशालला 12 किलो वजन वाढवावं लागलं आहे. तो या पोस्टमध्ये सांगतो की. "सुरुवातीपासून ते 20 व्या दिवसापर्यंत. 73 किलो ते 85 किलो. ऑडिशनची लुक टेस्ट सिलेक्शन. माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी धन्यवाद."
या पोस्टमध्ये विशालने ऑडिशनच्या लुक टेस्टचा फोटोही जोडला आहे.