By  
on  

पाहा Video : अनिरुद्धला अद्दल घडवण्यासाठी संजनाच्या पतिची अरुंधतीला मदत ?

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता अनिरुद्धला अद्दल घडवण्यासाठी संजनाचा पति शेखर पुढे सरसावला आहे. म्हणूनच शेखरने नुकतीच अरुंधतीची भेट घेतली आहे. अरुंधतीने अनिरुद्धला घटस्फोट द्यायचा नाही असं शेखरने अरुंधतीला सांगितलं आहे. शिवाय जर घटस्फोट दिला तर पोटगी मागायचा असा सल्ला दिला आहे. 

नुकतच संजना आणि शेखर यांच्या फोनवरील संभाषणात स्वत: शेखरच संजनाला या गोष्टी सांगतो. मात्र आता शेखरने मध्यस्ती केल्यानंतर अनिरुद्धला अद्दल घडणार का हे पुढील भागांमध्ये समोर येईलच.

 

अनिरुद्ध आता घरी खोडं सांगून संजनासोबत बाहेर आला आहे. सध्या मालिकेत अनिरुद्ध आणि संजनाचं नातं हे अरुंधती आणि मुलांना माहिती आहे. अनिरुद्धच्या आई-वडिलांना अद्याप खरं सत्य माहिती नाही. मात्र लवकरच हे सत्य समोर येणार आहे. हे सत्य कसं समोर येईल आणि ते समोर आल्यानंतर अनिरुद्धच्या कुटुंबियांच्या काय प्रतिक्रिया असतील हे मालिकेत समोर येईल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive