पाहा Video : जयदीपसोबत गौरी निघाली ऑफिसला, शालिनी आणि देवकीने गौरीला ठोकला सॅल्युट

By  
on  

'सुख म्हणजे नक्की काय अस'तं या मालिकेत आता जयदीप गौरीची साथ देताना दिसतोय. गौरीला त्रास देणाऱ्या शालिनी आणि देवकी वहिनींच्या जाचापासून गौरीला वेळोवळी वाचवताना जयदीप दिसतोय. 

नुकतच गौरी आणि जयदीप एकत्र ऑफिसला जाताना दिसतात. गौरीला जयदीपसोबत बाहेर पडताना पाहून शालिनी आणि देवकी वहिनी समोर येतात.मात्र हा आदेश दादासाहेबांचा आहे म्हटल्यावर दोघीची बोलती बंद होते. मग काय दोघी गौरीला सॅल्युट देखील ठोकतात. आणि जयदीप गौरीला ऑफिसमध्ये घेऊन जातो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

या सगळ्यात आता शालिनी पुढची खेळी काय रचेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दादासाहेबांच्या प्रकृतीखातर जयदीपने गौरीसोबत लग्न केलं आहे. मात्र जयदीप आणि गौरीचं हे अचानक केलेल्या लग्नाच्या नात्याता प्रेमाचं स्वरुप प्राप्त होईल का? तेव्हा या सगळ्यात जयदीप गौरीचं प्रेम समजू शकेल का ? यासाठी पुढील भाग पाहावे लागतील. 

Recommended

Loading...
Share