By  
on  

पाहा Video : 'आई कुठे काय करते' मधील ही अभिनेत्री गाते इतकी सुंदर

'आई कुठे काय करते' या मालिकेतील प्रत्येक कलाकार त्यांच्या व्यक्तिरेखेतून लक्षवेधी ठरत आहेत. मालिकेतील आईचीच भूमिका नाही तर प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळतय. या मालिकेत यशची मैत्रीण साकारणारी गौरी म्हणजेच अभिनेत्री गौरी कुलकर्णीही तिच्या भूमिकेतून लक्ष वेधते.

या मालिकेतून गौरी तिचं अभिनयकौशल्य दाखवतेय. मात्र गौरीला फक्त अभिनयाचीच नाही तर गायनाची सुद्धा आवड आहे. सोशल मिडीयावर गौरीचे अनेक गाण्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. नुकताच गौरीने आणखी एक व्हिडीओ शेयर केला आहे. यात तिने मोरा सय्या तो है परदेस हे गाणं गायलं आहे. गौरीने हे गाणं अतिशय सुंदर पद्धतिने गायलं आहे. सोशल मिडीयावरही तिच्या गाण्याचं कौतुक होतं. मालिकेच्या सेटवरही ब्रेकटाईममध्ये गौरी अशाप्रकारचे तिचे गाण्याचे व्हिडीओ करते. हा व्हिडीओ याच मालिकेती अभिनेता अभिषेक देशमुखने चित्रीत केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gauri (@gaurikulkarni23)

 

यासह आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचं गायन कौशल्यही सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाहायला मिळतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive