पाहा Video : गौरीला ऑफिसला जाण्यापासून थांबवण्यासाठी शालिनी वहिनीचा नवा प्लॅन

By  
on  

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत शालिनी वहिनी ही गौरीला सतावण्याची एकही संधी सोडत नाही. गौरीचं जयदीपसोबत लग्न झाल्यापासून तर शालिनी वहिनी गौरीला आणखी त्रास देऊ लागली आहे. नुकतच गौरीने जयदीपसोबत ऑफिसला जाणं सुरु केलं होतं. ही गोष्ट शालिनीला खुपत होती. 

गौरीला ऑफिसला जाऊ न देण्याचा नवा प्लॅन आता शालिनी वहिनीने केला आहे. यासाठी शालिनी वहिनीने चक्क गौरीला डांबुन ठेवलय. मात्र गौरीला न घेताच जयदीप निघून जातो.  गौरी आणि जयदीपमध्ये दुरावा निर्माण करण्याचा शालिनीचा हा प्रयत्न आहे. मात्र शालिनीच्या या प्रयत्नांना यश मिळेल का हे लवकरच कळेल.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

दादा साहेबांमुळे जयदीपने गौरीसोबत लग्न केलं आहे. पण या लग्नामुळे जयदीप आणि ज्योतिका दुरावले आहेत. मात्र आता गौरी आणि जयदीपमध्ये प्रेम खुलेल का हे पुढील भागांमधून कळेलच.

Recommended

Loading...
Share