पाहा Video : शालिनीचा प्लॅन पुन्हा ठरला फोल, जयदीपने अशी घेतली गौरीची बाजू

By  
on  

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत आता जयदीप प्रत्येक ठिकाणी गौरीच्या पाठीशी उभा दिसतोय. तर या सगळ्यात शालिनी वहिनी विविध प्लॅन करुन गौरीला माईंसमोरही चुकीचं सिद्ध करण्याची एकही संधी सोडत नाही. सध्या गौरी जयदीपसोबत ऑफिसात जाऊ लागलीय. शिवाय त्याच्या जेवणाचा डब्बाही घेऊन जाते. मात्र यावेळी असं काही झालं की माईदेखील गौरीवर चिडल्या.

जयदीप आणि गौरीच्या लग्नानंतर माई गौरीसोबत नीट वागत नाहीत. या लग्नाचा राग अजूनही त्यांच्या डोक्यात आहे. यातच शालिनीने गौरीची नवी चूक त्यांच्या निदर्शनास आणली आहे. ऑफिसात नेण्यात येणारे डब्बे रिकामे करून गौरीला चूकीचं सिद्ध केलं. पण गौरीलाही कळेना की डब्बे रिकामे कसे झाले ते. यावर माईंनी गौरीची चांगलीच शाळा घेतली. इतक्यात तिथे जयदीप येऊन उलट स्वत:च गौरीची माफी मागतो. आणि गडबडीत गौरीकडून हे घडलं असेल असं माईंना सांगतो. नुकत्याच प्रदर्शित केलेल्या या मालिकेच्या प्रोमोमध्ये हे पाहायला मिळतय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

मात्र आता ज्योतिका आणि जयदीपची जवळीक पुन्हा वाढताना दिसतेय. या सगळ्यात जयदीपला गौरीचं प्रेम कळेल का ? आणि प्रत्येक गोष्टीत गौरीला अडचणीत पाडणारी शालिनी आता कोणता नवा प्लॅन करतेय हे पुढील भागांमध्ये कळेलच.

Recommended

Loading...
Share