By  
on  

पाहा Video : दीपा-कार्तिकला दूर करण्याचा सौंदर्याचा नवा प्लॅन

'रंग माझा वेगळा' या मालिकेत दीपाला सुरुवातीपासूनच विविध अडचणींना सामोरं जावं लागतय. मात्र कार्तिकसोबत लग्न केल्यानंतर कार्तिकची आई सौंदर्या इनामदार दीपाच्या काळ्या रंगाचा द्वेष करते. सौंदर्याच्या अथक प्रयत्नांनंतरही दीपा आणि कार्तिक दुरावले नाहीत. म्हणूनच सौंदर्याने नवा मास्टर प्लॅन केला आहे.

दीपाला कार्तिकपासून दूर करण्यासाठी सौंदर्याचा हा नवा प्लॅन आहे. कार्तिकची मैत्रीण तनुजा अचानक त्यांच्या आयुष्यात आल्याने सगळ्या गोष्टी बदललेल्या पाहायला मिळत आहेत. मात्र तनुजाने दीपाशी चांगली मैत्री केली आहे. मात्र याच मैत्रीचा दीपाला पश्चाताप होणार की काय असं चित्र पाहायला मिळतय. कारण तनुजाची कार्तिकसोबत जवळीक आता वाढताना दिसत आहे. कार्तिकला मिळवण्यासाठी आता तनुजा सौंदर्यासोबत मिळवून दीपाला तिच्या प्लॅनमध्ये अडकवताना दिसतेय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

आता दीपा एकटी पडली आहे. एकीकडे दीपाची बहीण श्वेता इनामदारांच्या घरी सून म्हणून आली आहे. जी सुरुवातीपासूनच दीपाचा द्वेष करते. तर दुसरीकडे सौंदर्या आणि तनुजा एकत्र मिळून दीपाला कार्तिकपासून दूर करण्याचा प्लॅन करत आहेत. मात्र या दोघांना दूर करण्याचा प्लॅन हा यशस्वी होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आणि ते मालिकेच्या आगामी भागातून समोर येईलच.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive