पाहा Video : 'अग्गंबाई सासूबाई'मध्ये आसावरी आणि अभिजीतची स्कूटरसवारी

By  
on  

'अग्गंबाई सासूबाई'मध्ये आता आसावरीची साथ तिच्या मुलाने म्हणजेच बबड्याने सोडली असली तरी अभिजीत मात्र कायमच आसावरीसोबत आहे. दोघं सध्या घर सोडून निघून गेल्याने चाळीत राहत आहेत. मात्र तिथे दोघं सोबत असल्याने सुखात आहेत. त्यातच अभिजीत स्कूटरसवारीचा प्लॅन करतात. 

 

स्कूटरसवारीच्या खास प्लॅनसाटी आसावरी तयार होते. मात्र मोठ्या घरात मोठ्या आरश्यासमोर तयार होण्याची सवय असल्याने तयारीसाठी आसावरीला वेळ लागतो. मात्र तेवढ्यात अभिजीत येतात आणि तिला स्कूटर राईडसाठी घेऊन जातात. या दोघांचं प्रेम पाहुन चाळीतील रहिवाशीही त्यांचं कौतुक करतात. सोहमने दोघांची साथ सोडली असली तरी दोघांचं नातं दिवसेंदिवस खुलताना दिसत आहे. तर दुसरीकडे सोहम एकटा पडल्याचं पाहायला मिळतय. सोहमला त्याची चूक कळेल का हे पुढे समोर येईलच. 

Recommended

Loading...
Share