'रंग माझा वेगळा' या मालिकेत सुरुवातीपासूनच सौंदर्या ही दीपाच्या रंगाचा आणि दीपाचा द्वेष करते. सौंदर्याचा मुलगा कार्तिकसोबत दीपाचं लग्न झाल्यानंतरही दीपाला कार्तिकपासून वेगळं करण्यासाठी सौंदर्याने अनेक प्रयत्न केले. मात्र लहानपणी घडलेल्या घटनेचा इतका परिणाम सौंदर्यावर झाला की कृष्णवर्णीय व्यक्तिंचा ती द्वेष करु लागली. मात्र या सासू सूनेच्या नात्याला आता नव्याने सुरुवात होणार असल्याचं चित्र पाहायला मिळतय.
नुकताच मालिकेचा नवा प्रोमो पाहायला मिळतोय. ज्यात सौंदर्याने दीपाचे आभार मानले आहेत. नुकतच दीपाने सौंदर्याला महिलांकडून काळं फासण्यापासून वाचवलं. शिवाय इनामदार कुटुंबावर आलेल्या प्रत्येक संकटाला दीपा तोंड देते. यातच आता दीपा आणि सौंदर्याचं नातं चांगलं होणार अशी चिन्हे दिसत आहेत.
तेव्हा सौंदर्या दीपाला सून म्हणून स्विकारणार का ? दीपाचा भोळेपणा सौंदर्याला भावणार का ? दीपा आणि सौंदर्याचं नातं नव्यानं सुरु होणार का ? हे मालिकेच्या पुढील भागांमधून समोर येईल.