By  
on  

पाहा Video : "आ रहा हूँ.." म्हणत लाडू या दिवशी करणार बिल्लू बनून एन्ट्री

सध्या 'माझा होशील ना' या मालिकेतील लग्नाविषयी सर्वत्र चर्चा आहे. ज्या दिवसाची मराठी टेलिव्हीजन प्रेम वाट पाहत होते तो दिवस आता या मालिकेत पाहायला मिळतोय. ते म्हणजे सई-आदित्यचं लग्न. हे लग्न कधी होईल याची सगळ्यांना उत्सुकता होती. आणि अखेर हे लग्न आता होतय. मात्र हे लग्न आता अनेक कारणांनी लक्षवेधी ठरतय.

या लग्नात एक खास एन्ट्री होणार आहे. या मालिकेत आता ब्रम्हेंच्या कुटुंबातील एका पात्राची एन्ट्री होणार आहे. बंधू मामांचं पंजाबी मुलीशी लग्न झालं असून त्यांना एक मुलगा आहे. या मुलाची एन्ट्री या मालिकेत होणार आहे. हे पात्र साकारतोय लाडू म्हणून प्रसिद्ध असलेला राजवीर. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत लाडू हे पात्र प्रचंड गाजलं. राजवीरने साकारलेला लाडू सगळ्यांना आवडला. आता हाच लाडू 'माझा होशील ना' मालिकेत बिल्लू हे पंजाबी मुलाचं पात्र साकारतोय. येत्या 14 फेब्रुवारीला बिल्लूची एन्ट्री होत असल्याचं समोर आलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajveer (@rajveersinhraje)

 

नुकतच राजवीरच्या ऑफिशियल अकाउंटवरु एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. या व्हिडीओत राजवीरचा बिल्लू लूक पाहायला मिळतोय. या पोस्टमध्ये लिहीलय की, "आ रहा हूँ शादी मे धूम मचाने . .१४ फरवरी को..जरूर देखना".  दबंग सारख्या  एैटीत बिल्लूचा अंदाज पाहायला मिळतोय. तेव्हा लाडू आता बिल्लू बनल्यावर काय मजा येईल हे मालिकेत पाहायला मिळेलच.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive