'रंग माझा वेगळा' या मालिकेत आता दीपा प्रेग्नेंट असल्याचं पाहायला मिळतय. दीपा प्रेग्नेंट झाल्यापासून तिचा द्वेष करणारी सौंदर्याही आता तिची काळजी घेताना दिसत आहे. तर दुसरीकडे दीपाची बहीण श्वेता अजूनही तिचा द्वेष करतेय.
यातच दीपाच्या प्रेग्नेंसीमुळे कार्तिक प्रचंड आनंदी आहे. एकीकडे श्वेताने तिचं बाळ गमावल्याचं नाटक केलं तर दुसरीकडे दीपा प्रेग्नेंट आहे अशा परिस्थितीत इनामदार कुटुंबात दु:खानंतर आनंदाचं वातावरणही आलं आहे. मात्र या आनंदाला तडा देण्यासाठी श्वेता सज्ज आहे.
नेहमी श्वेताच्या चुका पोटात घालणारी दीपा आता प्रग्नेंसीमुळे होणाऱ्या बाळाच्या रक्षणासाठी सज्ज दिसतेय. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. या प्रोमोमध्ये दीपा श्वेताला धडा शिकवताना दिसत आहे. शिवाय दीपा आता होणाऱ्या बाळासाठी कणखर झाल्याचही चित्र पाहायला मिळतय.