By  
on  

पाहा Video : पाहा असं घडलं जेव्हा 'रंग माझा वेगळा'मध्ये दीपा आणि श्वेता आले समोरासमोर

'रंग माझा वेगळा' मालिकेत आता दीपा घर सोडून गेल्याचं पाहायला मिळतय. कार्तिकने दीपावर संशय घेतला आणि चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे दीपाने घर सोडण्याचा निर्णय घेतला. स्वत: वडिलांच्या घरीही तिला जागा मिळाली नाही. तेव्हा इथे तिथे भटकत अखेर दीपाने भाड्याचं घर मिळवलं. सध्या दीपा नोकरीच्या शोधात आहे.

नुकतच घर सोडलेली दीपा मात्र श्वेताला वाटेत दिसते. दीपाला पाहून श्वेता तिला हाक मारते आणि तिची भेट घेते. मात्र त्यानंतर जे घडतं ते या मालिकेत कधीच पाहायला मिळालं नाही. मालिकेत खलनायिका असलेली श्वेता नेहमीप्रमाणए दीपाला राग आणते. कार्तिकने दीपाच्या बाळांचं स्विकार केला नसून तो तिच्यावर संशय घेत असल्याची गोष्ट पुन्हा बोलून दाखवते. एवढच नाही तर अबॉर्शन करण्याचा सल्ला देते. बराच वेळ श्वेताचं सगळं ऐकून घेत दीपाचा रागाचा पारा मात्र चढतो. दीपा थेट श्वेताला कानशिलात लगावते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

हा सीन लवकरच या मालिकेच्या नव्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. तेव्हा श्वेता आणि दीपा जेव्हा समोरासमोर येतील तेव्हा आणखी काय काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नुकताच या नव्या भागाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive