By  
on  

स्टार प्रवाहवर नवी मालिका, ‘प्रेमा तुझा रंग कसा’ गुलाबी प्रेमाची काळी बाजू

प्रेम म्हणजे एक सुखद भावना. प्रत्येकजण प्रेम म्हणजे आयुष्यात गुलाबी रंगांची उधळण असंच समजतो. पण कधी कधी प्रेमाची एक दुसरी काळी बाजूसुध्दा असते. स्टार प्रवाह वाहिनीवर नव्याने सुरु झालेल्या ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या मालिकेत गुलाबी प्रेमाची काळी बाजू दाखवण्यात आली आहे. मराठी टेलिव्हिजनवर प्रथमच प्रेमामुळे घडणा-या गुन्ह्यांवर आधारित ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही मालिका स्टार प्रवाहवर रात्री दहा वाजता सुरु झाली आहे.

अभिनेता गश्मीर महाजनी प्रथमच छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. गश्मीर महाजनीनं अभिनेता म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रफ अँड टफ लूक्स आणि धीरगंभीर आवाज ही गश्मीरची खासियत. गश्मीर त्याच्या खास अंदाजात सूत्रसंचालन करणार आहे.

या मालिकेत सत्य घटनांपासून प्रेरित प्रेमकथा, त्यातील गुन्हे, त्यांचा उलगडा, तपास पाहायला मिळणार आहे. फक्त प्रेमाशीसंबंधित गुन्ह्यांवरील ही पहिलीच मालिका असेल, असं असलं तरी सध्या सर्वत्र या मालिकेवर ताशेरे ओढले जात आहेत. या मालिकेमुळे गुन्ह्यांना खतपाणी मिळत असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. म्हणूनच या मालिकेला कसा प्रतिसाद मिळतोय यावरुनच ते ठरेल.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive