अभिनेत्री अश्विनी महांगडे करतेय या कार्यक्रमाचं निवेदन, जाणून घ्या

By  
on  

अभिनेत्री अश्विनी महांगडे हे नाव आता कलाविश्वात चांगलंच परिचयाचं झालं आहे. अस्मितापासून ते आई कुठे काय करतेमधील आपल्या भूमिकेने अश्विनीने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अश्विनीने स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेत साकारलेली राणू अक्का आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. तिच्या या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. तर सध्या अश्विनी साकारत असलेली आई कुठे काय करतेमधील अनघा ही व्यक्तिरेखासुध्दा खुप लोकप्रिय ठरतेय. 
 

अश्विनीच्या चाहत्यांसाठी आता आणखी एक आनंदाची बातमी आहे.अश्विनी ही मन मंदिरा-गजर भक्तीचा या भक्तीमय कार्यक्रमाचं निवेदन करतेय. या कार्यक्रमाच्या शुटींगलासुध्दा सुरुवात झाली आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील विविध धार्मिक स्थळांना ती भेटी देत तिथलं महत्त्व अधोरेखित करणार आहे. 
 

Recommended

Loading...
Share