By  
on  

छोट्या पडद्यावर 'स्वराज्यजननी जिजामाते'च्या प्रवासाचे व्हा साक्षीदार

महाराष्ट्राचं आराध्य दैवत ‘छत्रपती शिवाजी महाराज’! एक आदर्श राजा आणि या रयतेच्या राजाचा आदर्श  असलेली त्याची पहिली गुरु...स्वराज्याची सावली राजमाता जिजाऊ. तळपता सुर्य कुशीत वाढवण्यासाठी जणू याच तेजस्वी मातेची निवड झाली असावी . अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत १४ वर्षांच्या बालशिवरायांना हाताशी घेऊन पुण्याच्या उजाड होत असलेल्या जमिनीत  तिने सोन्याचा नांगर फिरवला आणि शहाजीराजांसह पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं  अशी  'अखंड स्वराज्याची सावली'  असे जिचे वर्णन केले जाते  ती  राजमाता एक संवेदनशील माउली  सुद्धा होती, ती कर्तव्यदक्ष पत्नी होती आणि उत्तम  राज्यकर्तीही, ती धैर्यवान वीरांगना होती आणि सहिष्णु न्यायदेवताही!

 इतिहासाच्या पानांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे छाप पाडणाऱ्या  या १६व्या शतकातील स्त्रीशक्तीचं अष्टपैलू रूप म्हणजे जिजामाता .आपल्या गर्भातून केवळ एक कर्तृत्ववान बाळच नव्हे तर स्वराज्य जन्माला घालणाऱ्या  मुलखावेगळ्या आईची गाथा ‘स्वराज्यजननी जिजामाता’ येत्या १९ ऑगस्ट पासून सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे .

ह्या मालिकेची पत्रकार परिषद नुकतीच  पार पडली.  यावेळी मालिकेचे निर्माते खासदार डॉ. अमोल कोल्हे,विलास सावंत आणि घनश्याम राव , जिजाऊंच्या भूमिकेत दिसणारी अमृता पवार,छोट्या जिजाऊंची भूमिका करणारी निष्ठा वैद्य  आणि सोनी मराठीचे  बिझनेस हेड अजय भाळवणकर उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत जिजाऊंची महती सांगणारं मालिकेचं शीर्षक गीत  ही लाँच करण्यात आलं. हे गीत तयार करणारे गीतकार मंदार चोळकर, हे गीत  संगीतबध्द करणारे सत्यजित राऩड़े  अशी संपूर्ण म्युझिक टीम देखील उपस्थित होती.दिग्दर्शक विवेक देशपांडे मालिकेचे लेखक विवेक आपटे आणि प्रसाद ठोसर देखील उपस्थित होते . 

मराठी प्रेक्षकवर्गाला इतिहासाशी जोडणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या जगदंब क्रिएशन्सची ही दुसरी निर्मिती आहे. शहाजीराजांची स्वराज्य संकल्पना जोपासणाऱ्या माऊलीची गाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठीच 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेची निर्मिती केल्याचं खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितलं. दरम्यान स्वराज्य जननी जिजामाता ही केवळ मालिका नसून हा एक संस्कार असल्याचं ही ते म्हणाले.तेव्हा स्वराज्याची संकल्पना रुजवणाऱ्या या मुलखावेगळ्या आईची गाथा ‘स्वराज्यजननी  जिजामाता’ पहायला विसरू नका १९ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार  रात्री ८. ३० वाजता  फक्त सोनी मराठीवर.


 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive