अभिजीत बिचुकले आणि सुरेखा पुणेकर यांच्यामधले वाद 'दोन स्पेशल' मध्ये तरी मिटणार का??

By  
on  

बिग बाॅस मराठी 2 संपुन बरेच महिने झाली आहेत. तरीही प्रेक्षक घरातील काही सदस्यांना नक्कीच मिस करत असतील. बिग बाॅस मराठी 2 च्या घरात अभिजीत बिचुकले आणि सुरेखा पुणेकर यांच्यामधले वाद प्रेक्षकांच्या नक्कीच लक्षात असतील. बिचुकले आणि सुरेखाताई हे लवकरच 'दोन स्पेशल' मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणारा आहेत. 

अभिजीत बिचुकले आणि सुरेखाताई यांच्यामध्ये अनेक कारणांवरुन घरात छोट्या मोठ्या कुरबुरी व्हायच्या. यामध्ये अनेकदा सुरेखाताई स्वतःच्या खास शैलीत बिचुकलेंची बोलती बंद करायच्या. आता 'दोन स्पेशल'च्या भागात हे दोघे समोरासमोर आल्यावर काय धमाल होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

 

कलर्स मराठीवर 'दोन स्पेशल' हा मुलाखतींचा खास नुकताच सुरु झाला आहे. सर्वांचा लाडका जितु अर्थात जितेंद्र जोशी स्वतःच्या खुमासदार शैलीत आलेल्या दोन खास व्यक्तींची मुलाखत घेतो. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Recommended

Loading...
Share